12.9 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img

दुष्काळी अनुदानासाठी Ekyc साठी बळीराजा हतबल,रात्री-अपरात्री जागून होईना Ekyc,,,, माय-बाप हो हक्काचा पैसा मिळेल का ?

संपादकीय,,,,,,,,,,,,,,
शिंदखेडा – दुष्काळ सदोष परिस्थितीत शासना कडून आर्थिक मदत मिळण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे परंतु सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.गेल्या आठ दिवसापासून तालुक्यात के वाय सी लिंक प्रणाली बंद असल्यामुळे बँक खात्यात दुष्काळ निधी जमा होत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत शासनाने पाठपुरावा करून  लिंक लवकर सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान नेहमी येत असते परंतु येणाऱ्या सर्व अनुदानासाठी केवायसी करणे अनिवार्य केले आहे पण लिंक मात्र बे मुदत बंद ठेवायची असे शासनाचे धोरण असल्याचे दिसून येत आहे गेल्या आठ दिवसापासून शिंदखेडा तालुक्यात केवा वाय सी लिंक बंद असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहे. शिंदखेडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे तसेच चार-पाच महिन्यापासून शेतकरी मदतीची वाट पाहू लागला होता, गेल्या काही दिवसापूर्वी शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून तलाठी मार्फत फॉर्म भरून घेण्यात आले परंतु यासाठी केवायसी अनिवार्य केल्याने प्रत्येक शेतकऱ्याला केवायसी करणे अनिवार्य झाले आहे त्यासाठी ही लिंक सुरू असणे अतिशय गरजेचे आहे पण गेल्या आठ दिवसापासून ही प्रणाली बंद असल्यामुळे गाव ,खेड्यातील शेतकरी पदरचे पैसे खर्च करून तालुक्याच्या गावी येतो आणि लिंक बंद असल्याने परत जातो. तर काही शेतकरी रात्री अपरात्री गावातील आपले सरकार केंद्रावर तळ ठोकून बसले आहेत,या संगणक प्रणालीमुळे शेतकऱ्याला नसते हेलपाटे होत असल्याने दिसून येत आहे.त्यामुळे शासनाने केवायसी लिंक सुरू करून लवकरात लवकर खात्यात अनुदान जमा करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाने दिलेले दुष्काळ अनुदान वयोवृध्द लोकांसाठी मोठी कसरतिचा भाग आहे, शेतकरी – श्रीमती. लीलाबाई धनगर, कदाणे वयाचे ८० पार करणाऱ्या आम्ही शेतकरी वर्गाने काय करावे,आमचे बोटाचे ठसे उमटत नाही, यात शासनाने काही तरी मार्ग काढावा शेतकरी – श्री.नारायणसिंग तोडरसिंग गिरासे,अलाने जर आम्ही Ekyc केली नाही तर शासन आमच्या खात्यावर अनुदान जमा करणार नाही का? कारण आमचे बोटाचे ठसे उमटत नाही. शेतकरी – श्री. ब्रिजलाल मालजी भावसार,चिरणे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!