21.4 C
New York
Thursday, September 19, 2024

Buy now

निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच धुळे मतदार संघात काँग्रेसची खरी शोभा*

  • *निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच धुळे मतदार संघात काँग्रेसची खरी शोभा**निष्ठावंतांना डावलल्यामुळे काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर सोडणार काँग्रेसचा हात?*

प्रतिनीधी – भूषण पवार

शिंदखेडा : – लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे.काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ.शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली.त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असूनही आपल्यावर अन्याय झाला.त्यामुळे राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया श्याम सनेर यांनी व्यक्त केली आहे.पक्षाने मतदार संघाबाहेरील उमेदवाराला संधी दिल्याने तसेच शाम सनेर यांच्या राजीनामामुळे काँग्रेस मधील नाराजी समोर आली असून याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.धुळे जिल्ह्यातून काँग्रेसची न्याय यात्रा गेली पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल का?असा प्रश्न विचारला जात आहे.जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास नाही का अशी भावनात्मक चर्चा जनमानसात होत आहे.जिल्हाध्यक्षांच्या राजीनामामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत.जिल्ह्यात अनेक दिग्गज नेते असताना बाहेरून आयात उमेदवार तयार करणे ही पक्षाची नामुष्की असल्याचे बोलले जात आहे.उमेदवार बदलीची मागणी जोर धरू लागली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धुळ्यात आता भाजपचे डॉ. सुभाष भामरे, काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव आणि वंचितच्या अब्दुल रेहमान यांच्यात मुख्य लढत बघायला मिळणार आहे .

धुळे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसच्या उमेदवार डॉ.शोभा बच्छाव यांचे वडिल धुळ्यात शासकीय नोकरीला असल्याने, त्यांचे प्राथमिक शिक्षण धुळ्यात झालेले आहे. त्या नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील रहिवासी असून,त्यांची सासुरवाडी मालेगाव मध्य मतदारसंघातील सोनज येथील आहे.डॅा. बच्छाव ह्या २००९ मध्ये धुळे जिल्हयाच्या पालकमंत्री होत्या.तर सध्या धुळे जिल्हा कॅांग्रेसच्या प्रभारी आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!