दोंडाईचा :- आज दोंडाईचा येथे चौगांव खु येथील भगवानसिंग मंगलसिंग गिरासे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला शिंदखेडा तालुक्याचे मा.मंत्री तथा शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.जयकुमार भाऊ रावल यांच्या विकास कार्याने प्रभावित होऊन श्री भगवान गिरासे यांनी जयकुमार भाऊ रावल यांच्या उपस्थितीत आज दोंडाईचा येथे पक्ष प्रवेश केला या प्रवेशाने भाजपाला मोठा फायदा होणार असुन भगवान गिरासे यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने विरदेल आणि विखरण गटाच्या मतदारांना ते भाजपच्या वाटेवर आणण्यास कोणत्याही प्रकारची कसर करणार नाहीत.श्री भगवान गिरासे या आधी जि.प.चे माजी कृषि सभापती मा.राजेंद्र रामसिंग गिरासे (राजु दादा) यांचे कट्टर समर्थक होते व युवा नेते प्रितम दादा यांना देखील त्यांनी निवडणुकीच्या काळात चांगली मदत केल्याने एक युवा कार्यकर्ता भाजपात आल्याने या विभागात पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी मदत होऊ शकते .यावेळी लंघाणे चे सरपंच प्रतिनिधी तथा स्वप्न पूर्तीचे प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.जितू राजपुत कामपूर चे सरपंच ई.विष्णू पवार व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.