*शिंदखेडा मतदारसंघाचे तिकीट उमेदवाराची चाचपणी करून देवू – आमदार जयंतराव पाटील
*आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न*
शिंदखेडा :- येथील मनमिरा मंगल कार्यालयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी आमदार जयंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.महाविकास आघाडीतर्फे शिंदखेडा मतदार संघाचे विधानसभेचे तिकीट आम्ही उमेदवारांची चाचपणी करूनच देऊ असे आमदार जयवंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.यावेळी कामराज निकम यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.काही दिवसापूर्वी कामराज निकम यांनी पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.भाऊसाहेब कामराज निकम यांनी आमदारकी लढविण्याचे स्वप्न बाळगून भाजपाला सोडचिट्टी दिली असल्याची चर्चा जनतेतून होत होती.परंतु आजच्या सभेत आमदार जयवंतराव पाटील यांच्या वक्तव्याने जनतेत संभ्रम निर्माण झाल्याचे वातावरण दिसून आले.काही कार्यकर्ते शिंदखेडा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षातर्फे उमेदवारीसाठी संदीप दादा बेडसे तर काही कार्यकर्ते भाऊसाहेब कामराज निकम यांच्या नावाची चर्चा करत असताना दिसून आले.तर सभेला आलेल्या काही कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे श्याम दादा सनेर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने चे हेमंत साळुंखे यांच्या नावाची चर्चा चालू होती.
कार्यकर्ता संवाद सभेला तालुकाभरातून कार्यकर्ते सहभागी झाले होते.सभेला दुपारी 03 वाजेच्या सुमारास सुरवात झाली.यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत महिला आघाडीच्या रोहिणी खडसे,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, भाजपातून नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले जि.प.चे माजी गटनेते कामराज निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पाटील, ज्येष्ठ नेते विठ्ठलसिंह गिरासे,जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारुळे,तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे, रतिलाल पाटील,आनंदा पाटील, डॉ.जितेंद्र ठाकूर, देविदास मोरे, दयाराम कुवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.