छत्रपती,फुले,शाहु,आंबेडकर, यांच्या विचारांचे स्वराज्याला चालना देऊया….
बाम्हने :- छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,महर्षी वाल्मिकी,भगवान विर एकलव्य, लोकशाहिर आण्णा भाऊ साठे,संत गाडगेबाबा,संत सेना महाराज,संत रोहिदास महाराज….
या सर्व महामानवांच्या,महापुरुषाच्या संयुक्त जन्मोत्सव निमित्ताने…
कै.नंदकुमार हरि निकम यांच्या स्मरणार्थ बाम्हने गावातील तरुण तडफदार युवा नेतृत्व,छत्रपती संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष,भाजपा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष श्री.राहुल नंदकुमार निकम यांच्या हस्ते गावातील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारे होतकरू युवकांना अभ्यास व सराव करण्यासाठी स्पर्धा परिक्षेचे सुमारे दहा हजार रुपयांचा पुस्तकांचा संच भेट म्हणुन दिला,त्याबद्दल मा.राहुल निकम यांचे एकता ग्रुपच्या वतीने मनस्वी आभार मानण्यात आले.