12.7 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

spot_img

*शिंदखेडा येथे ग्रामसेविका राजबाई पाटील यांना लाच घेताना रंगेहात अटक,,,

प्रतिनीधी – भूषण पवार

शिदखेडा – येथील ग्रामपंचायत,मौजे चौगांव बु. ता.शिंदखेडा जि. धुळे येथील ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांचेकडुन १५,०००/- रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील तक्रारदार यांनी ग्रामपंचायत चौगांव बु. येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम घेवुन ते काम पुर्ण केले असुन सदर कामावर झालेल्या खर्चाचे बिल तक्रारदार यांना अदा करण्यात आले होते.तसेच तक्रारदार यांनी मौजे चौगांव बु. येथे रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम केले असुन त्या कामाकरीता झालेल्या खर्चाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते म्हणुन तक्रारदार यांनी सुमारे १ महिन्यापुर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेवुन त्यांनी केलेल्या रस्ता सिमेंट कॉकीटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली असता ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे रस्ता कॉकीटीकरणावर झालेल्या खर्चाचे बिल काढण्याकरीता तसेच तक्रारदार यांनी यापुर्वी केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे बिल काढून दिल्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे २५,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. धुळे कार्यालयाकडे दि.०४.०४.२०२४ रोजी तक्रार दिली होती. सदर तकारीची दि. ०४.०४.२०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे २५,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५,०००/- रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने दि. १५.०४. २०२४ रोजी सापळा कारवाई दरम्यान तकारदार यांचेकडुन १५,०००/- रुपये लाचेची रक्कम त्यांचे शिंदखेडा येथील राहते घरी स्वतः स्विकारतांना ग्रामसेविका राजबाई पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री.अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर, मपोकॉ. दिपाली सोनवणे या पथकाने केली आहे. सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस वाचक उप अधिक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

ताज्या बातम्या