✍️✍️🚥🚥✍️✍️
शिंदखेडा प्रतिनिधी:- भूषण पवार
शिंदखेडा :- शहरातील गेल्या दहा वर्षा पासुन सप्तशृंगी मातेच्या वणी गडावर पायी जाण्याची परंपरा शनिमंदिर चौक राजपूत गल्ली येथून मा.नगरसेवक चेतन परमार व भाजप शहर उपाध्यक्ष योगेशशेठ कासार यांच्या नेतृत्वातील तरूणांनी कायम ठेवली आहे. आज रोजी शनिमंदिर चौक राजपूत गल्ली येथील सालाबादा प्रमाणे या वर्षी हि सप्तशृंगी मातेच्या वणी गडावर पायी जाण्यासाठी पदयात्रा निघाली यात उत्साह वाढवण्यासाठी मा.मंत्री आ.जयकुमारभाऊ रावल यांनी देखील सहभाग घेतला व पदयात्रा सुखरूप होवो ह्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मा.नगरसेवक चेतन परमार,भाजप शहर उपाध्यक्ष योगेशशेठ कासार,रामकृष्ण गिरासे,गोपाल शेठ कासार,भाजप शहर सरचिटणीस भुपेंद्रसिंह राजपूत, गजेंद्र गिरासे,सुरेंद्रसिंग राऊळ,पप्पू कासार,सोनुशेठ कासार,दिपनेश परमार,प्रा.जे.के.परमार,भुषण माळी,विक्रांत राऊळ,भरत पाटील, निलेश माळी,चंदू माळी,लालसिंग गिरासे,मुन्ना कासार,अनिल कासार,रविंद्र परमार,प्रदिप कासार,बादल आण्णा,नंदु परमार,संतोष माळी,नरूआबा,प्रविण गिरासे,राजेंद्र माळी,राजेंद्र माळी नंदुरबारकर,संदिप कासार,दिलिप परमार,हिंम्मत परमार,आदी उपस्थित होते