दोंडाईचा :-खान्देशातील तरूणांच्या वकृत्व गुणांना वाव मिळावा या उद्देशाने दि.०८ एप्रिल रोजी दोंडाईचा शहरातील दादासाहेब रावल नाॅलेज सिटी येथे ‘आमदार वक्तृत्व चषक दोंडाईचा – २०२४’ या भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन सन्मा.प्रा.सतिषजी अहिरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
या अभूतपूर्व कार्यक्रमाला माजी कॅबिनेट मंत्री मा.आ.जयकुमार रावल कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती पंकज कदम,पंस सभापती रणजित गिरासे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक बागल, लंघाणे सरपंच जितेंद्र गिरासे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या स्पर्धेत ४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला, त्यात प्रथम क्रमांक अमोल दिलीप पाटील यांनी मिळविला त्यास १० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले, द्वितीय क्रमांक अखिलेश पाटील यांनी मिळविला त्यास ७ हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले तर तृतीय क्रमांक यांनी पटकाविले त्यास ५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.स्पर्धेला अवघ्या खान्देशातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या वक्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे आयोजन ॲड.चेतन गुलाबराव पाटील,भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष मा.राहुल निकम डॉ.बी.एम.पाटील,प्रा. सतिष अहिरे यांनी केले.परिक्षक म्हणून हृषीकेश धनगर व प्रीतम निकम हे होते.