spot_img
spot_img

कमिशनअभावी शिंदखेड्यात रेशन दुकानदारांचा एल्गार; १ मार्चपासून धान्यवाटप बंदचा इशारा

कमिशनअभावी शिंदखेड्यात रेशन दुकानदारांचा एल्गार; १ मार्चपासून धान्यवाटप बंदचा इशारा

शिंदखेडा : – तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना मागील ५ ते ८ महिन्यांपासून धान्य वितरणाचे कमिशन मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या रेशन दुकानदारांनी १ मार्च २०२६ पासून धान्य वितरण बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन आज (दि. ११ फेब्रुवारी) तहसीलदार प्रतिनिधी व तालुका पुरवठा अधिकारी नितीन नंदावर यांना शिंदखेडा तालुका रेशन संघटनेतर्फे देण्यात आले.

दरमहा पाच तारखेपर्यंत धान्यवाटपाचे कमिशन मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात चार, पाच ते आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही दुकानदारांना मोबदला मिळालेला नाही. यामुळे अनेक दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले असून ज्यांच्याकडे रेशन दुकान हेच एकमेव उदरनिर्वाहाचे साधन आहे, त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

यापूर्वीही संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींना लेखी निवेदने देण्यात आली; मात्र ठोस तोडगा निघाला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. काही दुकानदारांकडे तहसील कार्यालयात येण्यासाठी एसटी भाडेदेखील नसल्याची वेळ ओढवली असून, “आता उपासमारीची वेळ आमच्यावर आली आहे,” अशी तीव्र भावना दुकानदारांनी व्यक्त केली.

१ मार्च २०२६ पर्यंत सर्व प्रलंबित कमिशन अदा करण्यात यावे, अन्यथा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार धान्यवाटप बंद ठेवून शासनाच्या धोरणाविरोधात बहिष्कार टाकतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय न घेतल्यास याचा फटका थेट लाभार्थ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी रेशन संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!