spot_img
spot_img

हिंदू मंदिराविषयी जातीयद्वेष पसरवून आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करा !

*हिंदू मंदिराविषयी जातीय विद्वेष पसरवून आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करा !

*हिंदु जनजागृती समितीची दोंडाईचा(धुळे) येथे केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी !*

*दोंडाईचा (धुळे) : – ‘हिंदू मंदिरात काम करण्यासाठी जाणे सर्वात मोठे महापाप आहे, तसेच मंदिर वा चर्चमध्ये जाण्यापेक्षा हजारो लोकांना मारणार्‍या शस्त्र बनवणार्‍या कारखान्यात जाणे अधिक चांगले. मंदिर किंवा चर्च येथे ‘शिर्क’ (महापाप) केले जाते. ‘शिर्क’ हे इस्लामनुसार महापाप आहे. अल्लाहने स्पष्टपणे म्हटले आहे की, मी कोणालाही माफ करू शकतो, पण ‘शिर्क’ केलेल्याला कधीही माफ करत नाही…’, अशी अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये इस्लामिक रिसर्च फांऊडेशनचे डॉ. झाकीर नाईक याने ‘हुडा टी.व्ही.’ नावाच्या यू-ट्यूब चॅनलवर मुलाखत देतांना केली आहेत. यातून कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदू मंदिरांविषयी समाजात जातीय विद्वेष, घृणा आणि शत्रुत्वाची भावना पसरवून आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे दुष्कृत्य झाकीर नाईक याने केले आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे दोंडाईचा येथे केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोंडाईचा चे नायब तहसीलदार श्री. राजेंद्र घोलप साहेब यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. या वेळी निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री.चुडामन बोरसे श्री.प्रफुल्ल भोई, अजय भोई, मुकेश कोळी, मुकेश सोनवणे, दानविर पाटील, जगदीश परदेशी, वेदांत राजपूत, राहुल कोळी हे उपस्थित होते.

केंद्र सरकारने आतंकवादी संघटना म्हणून बंदी घातल्यानंतरही झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशन यांचे फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम आदी सर्व अनेक सामाजिक माध्यमांवरील सर्व अकाऊंट सुरू आहेत. ती सर्व त्वरित बंद करण्यात यावीत अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.

आपला नम्र,
श्री. प्रशांत जुवेकर
हिंदू जनजागृती समिती करिता
संपर्क : +919552426439

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!