*खाकी वर्दीतील पो.शि.चेतन माळी यांचा प्रामाणिकपणा.
प्रतिनीधी – महेश माळी
शिंदखेडा :- शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे, सोबत कर्मचारी पोलीस शिपाई भारत मोहिते, चालक पोलीस शिपाई चेतन माळी आणि पोलीस मित्र चेतन पाटील असे दैनंदिन ड्युटी विभागीय गस्त कामी रवाना झाले होते. विभागीय गस्त करीत असताना शिरपूर टोलनाक्या जवळ नॅशनल हायवे ०६ वर पोलीस शिपाई चेतन माळी यांना एक एप्पल कंपनीचा व दुसरा रियल मी कंपनीचा असे एकूण साधारणत: *०१ लाख ३० हजार* रुपये किंमतीचे दोन मोबाईल सापडले. दोघेही मोबाईल हे चालू स्थितीत असल्याने पोलीस शिपाई चेतन माळी व सहकारी यांनी संबंधित मूळ मालकाचा शोध घेऊन मालक प्रथमेश संजय अहिरे राहणार नकाने रोड धुळे यांना त्यांचे हरवलेले दोघेही मोबाईल परत केले. हरवलेले महागडे मोबाईल मूळ मालकास परत केल्याने खाकी वर्दीतील नेहमीचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याने शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील साहेब, कर्मचारी वृंद तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून पोलीस शिपाई चेतन माळी सहकारी पोलीस शिपाई भारत मोहिते व पोलीस मित्र चेतन पाटील यांचे कौतुक केले जात आहे…..