प्रतिनीधी – भूषण पवार
शिंदखेडा :- महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगमध्ये बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने केली. या आशयाचे एक निवेदन ही धुळे जिल्हा शाखेने श्री एस.पी.तावडे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्राहक वाद निवारण आयोग मुंबई यांच्याकडे स्पीड पोस्ट ने पाठविण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व ग्राहक आयोगात काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आली होते.मात्र विशिष्ट कारणामुळे सर्व आयोगातील बायोमेट्रिक मशीन अचानक बंद झालेले आहेत . त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी व कामकाजाची वेळ यांची पडताळणी करता येत नाही व पारदर्शकता ही राहत नाही असे आम्हास वाटते.
महाराष्ट्रातील सर्व ग्राहक आयोगात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत गरजेचे आहे.कामकाज सुरळीतपणे सुरू आहे .कामात पारदर्शकता आहे .तसेच ग्राहक आयोगात काम करणारे अधिकारी, कर्मचारी ,ग्राहक ,वकील व इतर मंडळी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक आयोगात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे असे आम्हास वाटते.
सबब आमच्या उपरोक्त दोन्ही मागण्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा व तात्काळ आमची मागण्या पूर्ण करण्यात याव्यात ही नम्र विनंती.
काही वर्षांपूर्वी प्रत्येक मंचात आयोगात बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आले होते.या कामावर शासनाने लाखो रुपये खर्च केलेले होते .मात्र विशिष्ट कारणामुळे सर्व मशीन बंद पाडण्यात आली किंवा बंद पडलेली आहेत .त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांची नुकसान झालेले आहे .सबब नवीन बायोमेट्रिक व मशीन सीसीटीव्ही कॅमेरे बसल्यानंतर ते बंद पडणार नाही .याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा आयोगाचे अध्यक्ष सदस्य प्रबंधक यांच्यावर टाकण्यात यावी अशा आशयाचे निवेदन विभाग अध्यक्ष डॉ.अजय सोनवणे,जिल्हाध्यक्षॲड.जे.टी.देसले, जिल्हा संघटक प्रा.चंद्रकांत डागा, उपाध्यक्ष डॉ.एन. के. वाणी, सचिव एस. एम.पाटील, कोशाध्यक्ष राजेंद्र भंडारी, सहसंघटक पी. झेड. कुवर, सहसचिव एम. टी. गुजर, जिल्हा संघटीका श्रीमती आशाताई रंधे, धुळे शहराध्यक्ष ॲड.चंद्रकांत येशीराव यांनी पाठविले.