13.6 C
New York
Thursday, October 10, 2024

Buy now

आई आशापुरी व पेडकाई मातेचे दर्शन घेत डॉक्टर सुभाष भामरे यांनी नारळ फोडून केला प्रचाराचा शुभारंभ,,,,

प्रतिनिधी – भूषण पवार

शिंदखेडा : – भाजपची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होताच,त्यात माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांना सलग तिसऱ्यांदा धुळ्यातून उमेदवारी देण्यात आल्याने धुळे भाजपमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे.यंदा परत डॉ सुभाष भामरे हे धुळे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.अशातच भाजपतर्फे सुभाष भामरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जोरदार तयारी धुळे भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.येत्या 20 मे रोजी धुळे लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे.त्यासाठी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे.शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील श्री पेडकाई माता व पाटण येथील श्री आशापुरी मातेचे दर्शन घेऊन डॉ.सुभाष भामरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह प्रचाराचा नारळ फोडला.यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.पुढे शिंदखेडा येथे बिजासनी मंगल कार्यालयात भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की सुलवाडे जामफळ योजनेचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून येणाऱ्या दीड वर्षाच्या कालावधीत काम शंभर टक्के पूर्ण होईल व तापी नदीचे पाणी तुमच्या शेतापर्यंत पोहोचेल.तापी माय शिंदखेडा तालुक्यातून वाहते त्यासाठी आपण भाग्यवान आहोत.जामफळ धरणातून शिंदखेडा तालुक्यातील 50 गावांना नळातून पाणी दिले जाईल. या योजनेप्रमाणेच तापी बूराई योजनेसाठी आमदार जयकुमार भाऊ प्रयत्नशील आहेत.त्यांच्या प्रयत्नानेच या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.काँग्रेसच्या 70 वर्षाच्या कार्यकाळात त्या सरकारने जामफळ योजनेसाठी एक नवा पैसा आणला नाही पण तापी बुराई योजनेसाठी लागणारे एक हजार कोटी रुपये केंद्रातून मंजूर करून आणल्याशिवाय मी आणि आमदार जयकुमार भाऊ स्वस्थ बसणार नाहीत. ते पुढे म्हणाले की धुळे व शिंदखेडा तालुका च्या कपाळावर दुष्काळी तालुका असल्याचे लिहिले होते व ते पुसायचं काम आमदार जयकुमार भाऊ रावल व आमच्या माध्यमातून झाले आहे. ही निवडणूक देशाचे नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वात अनेक विकास कामे झालेले आहेत. तरी मतदार बंधू भगिनींनो देशाचे नेतृत्व परत मोदी साहेबांच्या हातात देण्यासाठी भाजपला विजयी करावे.
यावेळी आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी देखील मनोगत व्यक्त केले.प्रसंगी मा.केंद्रीय मंत्री खासदार तथा धुळे लोकसभा चे उमेदवार डॉ.सुभाष बाबा भामरे,मा.मंत्री आ.जयकुमारभाऊ रावल सह भाजपचे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती भाऊसाहेब नारायण पाटील, कामराज भाऊसाहेब, शिंदखेडा नगरपंचायत चे लोकनियुक्त नगराध्यक्ष रावसाहेब अनिल वानखेडे,शिंदखेडा तालुका अध्यक्ष दिपक बागल, भाजपचे शिंदखेडा शहर अध्यक्ष अॅड.विनोद पाटील,जिल्हा चिटणीस प्रविण माळी,मा.सभापती महाविर रावल,भाजप शिंदखेडा शहर सरचिटणीस भुपेंद्रसिंह राजपूत,सरचिटणीस संजयकुमार महाजन, मा.सभापती संजिवणीताई सिसोदे,मा.सभापती राजेंद्र देसले, सभापती पंकज कदम,चंद्रकलाताई सिसोदिया, मा.जि.प.सदस्य विरेंद्र गिरासे,जिल्हा सरचिटणीस डि एस गिरासे,जि.प.मा.अध्यक्षा,संगिता ताई देसले,धनंजय मंगळे,पं.स.सभापती रणजितसिंह गिरासे,दिनकरराव पाटिल इंदवे सरपंच, दिपक मोरे उपसभापती,रणजितसिंह गिरासे मा.उपसभापती,किशोर रंगराव पाटील मा.सभापती,संचालक पी.एल.पवार,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सुरज देसले,प्रभाकर पाटिल,प्रविण मोरे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल देसले,शिंदखेडा शहर उपाध्यक्ष संदिप गिरासे,योगेशशेठ कासार आदी. मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!