प्रतिनीधी: : – प्रतीनिधी – भूषण पवार
- शिंदखेडा :- भगवान महावीरांनीसांगितलेलेअहिंसा,सत्य,अचोर्य, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे सिद्धांत आज ही सार्थक आहे. सामान्य व्यक्तीला जन म्हणतात.या शब्दावर दोन मात्रा लावल्यावर तो जैन म्हटला जातो. हे दोन मात्रा राग आणि द्वेष कमी करण्याच्या प्रयत्न करणारा जैन आहे. जैन केवळ जन्माने होत नाही तर जो जैन धर्माला मानतो त्यालाही जैन म्हटले जाते.
जैन धर्म अवतार मानत नाही, पण पुनर्जन्म मानतो.महावीरच्या जीव ने त्यांचा संसार काळात अनंत जन्म मरण केले. पण नयसार च्या भवमध्ये सम्यग दृष्टी प्राप्त झाल्यामुळे,तेथून एकूण त्याचे 27भव (जन्म मरण ) झाले. महावीरांचे मूळ नाव वर्धमान होते. त्यांनी संयम घेतल्यावर अनेक उपसर्ग व परिषह आले.ते त्यांनी समभाव पूर्वक सहन केले.यासाठी देवता यांनी त्यांचे नाव वर्धमान ठेवले होते.राग आणि द्वेष हे कर्म बंधनचे म्हणजेच भवभटकंतीचे मुख्य कारण आहे. मोह, ममत्व,आसक्ती,लोभ, लालच,परिग्रह,ठगणे,तुझे -माझे करणे इत्यादी राग आहे.तर संताप कलह,नाराजी, क्रोध, इत्यादी द्वेष आहे. आज प्रत्येक व्यक्ती राग व द्वेष मध्ये अडकलेला आहे. प्रत्येकाला लवकर श्रीमंत व्हायचे आहे.भौतिक सुख सुविधा त्याला खुणावतात,जे उत्पन्न मिळत आहे,त्यात तो समाधानी नाही.खऱ्या अर्थाने तो ज्या सुख सुविधामधे सूख मानतो ते खरे सूख नव्हेच.भगवान महावीर म्हणतात,ते क्षणिक सुख आहे. शरीर नश्वर आहे तर आत्मा अमर आहे. आत्मिक सुख हे कधीही नाश होत नाही.असे शाश्वत सुख प्राप्तीसाठी मानवाने प्रयत्नशील असले पाहिजे.जो व्यक्ती जन्मला आहे तो, एक दिवस मरणार हे निश्चित आहे.ज्ञानीजन नेहमी हेच सांगतात,
उडते हुए पंछीने
लिया,रेन बसेरा
उडना ही पडेगा तुझे, होते ही सवेरा
कल रात कही और बिताना ही पडेगा
घर और कही जा के बसाना ही पडेगा!!
तरी व्यक्ती आपल्या या थोड्याशा आयुष्यात खोटे बोलतो,लबाडी करतो, इतरांना कमी लेखतो,लोभ लालच साठी आपली श्रद्धा, निष्ठा,समर्पणता वेशीवर टांगतो.
आजची युवा पिढी ही भटकत चालली आहे वेस्टर्न आणि मॉडर्न संस्कारामुळे सभ्यता कमी होत आहे .व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. युवा पिढी आज वडीलधाऱ्यांचे ऐकायला तयार नाही.
महावीर म्हणतात,व्यक्ती जन्माने नाही आपल्या कर्माने महान होत असतो. केलेल्या कर्माची फळे आपल्याला भोगावेच लागतात. त्यामुळे लहानपणीच मुलांना चांगले संस्कार देणे आवश्यक आहे .प्राथमिक शाळेत नितीमूल्यांवर भर दिला पाहिजे. जीवनात संतोष, धैर्य, शांती, निरासक्ती, क्षमा हे शिकविणे गरजेचे आहे. हाच आत्मकल्याणाचा मार्ग आहे.
क्या लेके आया रे बंदे,क्या लेके जायेगा
दो दिन की जिंदगी है,दो दिन का मेला!!
निरासक्त भाव वाढले पाहिजे. माझे घर, दुकान ,फार्म हाऊस, अपार्टमेंट, कॉलनी,आभूषण यावर आसक्ती ठेवणे. माझा परिवार,माझी मुले, मुली,नातं – गोतं हे पाहून हर्षित होणे,गर्वित होणे हे सर्व राग आहे.राग कमी झाला म्हणजे आपोआप लोभ कमी होतो.लोभ कमी झाला म्हणजे मिळवण्याची आसक्ती कमी होते.त्यागाची भावना वाढते. आसक्ती कमी झाली,म्हणजे,आपोआप दुर्गुण कमी होतात.
जैन धर्मात त्यागाला महत्व आहे. गुजराथच्या मेहसाणा येथील व्यापारी भावेश भंडारी व त्यांच्या पत्नी आपली 200करोड रुपयांची संपत्ती दान देऊन इतर 33जणांसोबत दिनांक 22एप्रिल 2024रोजी अहमदाबाद येथे दिक्षा घेत आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या 16वर्षाच्या मुलाने व 19वर्षाच्या मुलीने दीक्षा घेतली होती. यांच्या प्रेरणेने हे दांपत्य दीक्षा घेत आहे.
जैन अनुयायी ज्ञान, दर्शन, चारित्र व तप या साधनेत दृष्टिगत होतो.
महावीरांनी साडे बारा वर्ष घोर तपस्या केली.
वर्तमान मधे भगवान महावीर ला मानणारे जागो जागी मिळतील. त्यांना मणवणारे ही भरपूर मिळतील. पण त्यांची मानत नाही.माझे जीवन हाच माझा उपदेश आहे,असे महावीर म्हणत.आज भगवान
महावीरांचा उपदेशांचे आपल्या सोयीनुसार वेगवेगळे अर्थ काढून सांगीतले जात आहे. आजच्या महावीरांच्या जन्म दिवशी त्यांची शिकवण खऱ्या अर्थाने जीवनात उतरविणे, आपल्या मनात त्यांचा जन्म होणे, हीच त्यांची जयंती साजरी करणे सार्थक होईल.
-प्रा.चंद्रकांतडागा,
शिंदखडा(जि. धुळे )