27.4 C
New York
Friday, June 21, 2024

Buy now

spot_img

माजी आमदार रामकृष्ण पाटील (ऊबाठा) शिवसेनेच्या वाटेवर,,

प्रतिनीधी – भूषण पवार

शिंदखेडा :- शिंदखेडा मतदार संघाचे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत असलेले माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील स्वगृही परतणार म्हणजे उद्धवसाहेब ठाकरेंचे शिवबंधन बांधणार असे खात्रीशिर वृत्त आहे.रामकृष्ण तात्यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला आहे 1984-85 च्या काळात रामकृष्ण तात्यांनी शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे गावासह सर्वत्र शिवसेनेच्या शाखा सुरू करून आपल्या सामाजिक कार्यास सुरवात केली होती व तेंव्हा सारे वातावरण भागवामय केले होते शिवसेना पुढे आणण्याचे काम त्यांनी केले होते रामकृष्ण तात्यांना त्याकाळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद लाभला होता तात्यांचे कार्य पाहून 1999 मधील विधानसभा निवडणुकीत शिंदखेडा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याचे सोने करत ते 1999 ते 2004 या कालावधीसाठी ते आमदार झाले होते सामाजिक कामाचा सपाटा त्यांनी लावला होता
शिंदखेडा तालुका व मतदार संघातील तळागाळातील नागरिकांसाठी तात्या चांगलेच परिचित झाले होते गोरगरिबांना शासकीय मदत उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी होत होते.त्याकाळात नारायण राणे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ख्याती होती दरम्यान राणे साहेबांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून साधारणतः 2005 -2006 मध्ये तात्यांनीही जयमहाराष्ट्र करीत कांग्रेसमध्ये प्रवेश केला तात्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने मोठेच वादळ निर्माण झाले होते मात्र राणे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून तात्यानीही माघार घेतली नाही काही कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये संदीप बेडसे दाखल झाले तर जोडीला तात्याही दाखल झाले व राष्ट्रवादीच्या माध्यमातून रामकृष्ण पाटील आपल्या कार्याचा ठसा उमटवू लागले.
तात्यांनी आज महाराष्ट्रातिल राजकीय परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटासोबत जाण्याचा संकल्प केला आहे मुंबईत त्यांनी उद्धवसाहेब ठाकरे यांची भेटही घेतली सोबत शिवसेनेचे खन्दे समर्थक मंगेश पवार उपस्थित होते लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान उधवसाहेबांच्या उपस्थितीत आपल्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या