12.9 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

spot_img

पांझरेच्या पुराने नकाणे – हरण्यामाळ तलाव न भरण्याची घोडचूक करणाऱ्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी,,,,

संपादकीय,,,,,,

धुळे :- पावसाळ्यात नकाणे व हरण्यामाळ तलाव पांझरेच्या पुर पाण्याने भरून न घेण्याची घोडचुक करणार्‍या अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन नागरी सेवा सुविधा समिती चे निमंत्रक, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व आरटीआय कार्यकर्ते योगेंद्र जुनागडे यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना दिले आहे.

या निवेदना त त्यांनी नमुद केले आहे, की धुळे शहराला पाणी पुरवठा करणारे नकाणे व हरण्यामाळ तलाव हे दोन प्रमुख स्रोत आहेत.  दरवर्षी पावसाळ्यात पांझरा नदीच्य पुराचे वाहून जाणारे पाणी जम्बो कॅनल द्वारा त्यात भरून घेवून शहराला पुरविले जाते.

 फक्त  या वर्षी पावसाळ्यात  हे तलाव भरण्यात आले नाहीत. त्यामुळे अक्कलपाडा धरण भरल्यावर शेकडो – हजारो एमसीएफटी पांझरा पुराचे पाणी वाहून वाया गेले.

 यावर्षी नकाणे – हरण्यामाळ हे दोन्ही तलाव मिळून सुमारे आठशे एमसीएफटी पाणी साठवले गेले नाही. हे तलाव फेब्रुवारीतच कोरडे पडले.  हे सातशे ते आठशे  एमसीएफटी पाणी आता एपिल – मे च्या कडक उन्हाळा व पाणी टंचाईत धुळे शहराला दिले असते किंवा पांझरेत सोडले असते तर धुळे ते मुडावद असे धुळे – शिंदखेडा – अमळनेर तालुक्याच्या पंचवीस तीस गावांना पिण्याचे पाणी टंचाई दूर करण्या साठी उपयोगात पडले असते.

 अक्कलपाडा धरणातून या गावांसाठी आता पांझरेत पाणी सोडल्याने या धरणाची पाणी पातळी कमी झाली. त्यामुळे धुळे शहर पाणी योजनेच्या जॅकवेल पर्यंत पाणी येत नाही. त्यासाठी मनपाला धरणात चारी खणावी लागत आहे.त्यामुळे धुळेकरांचा पाणी पुरवठा  बाधित झाला आहे. तीन वरून सहा – सात – आठ दिवसावर हा पाणी पुरवठा गेला आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल वाढले आहेत. मुळ स्त्रोत असणारे नकाणे – हरण्यामाळ  तलाव भरून घेतले असते तर ही समस्या आली नसती.

  सदर प्रकरणी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नकाणे –  हरण्यामाळ तलाव भरून न घेण्यासाठी – या घोडचूकसाठी कोण जबाबदार आहेत?  त्यावर काय कारवाई झाली? म्हणून वारंवार माध्यमांमधुन लिखाण झालेले आहे. परंतु या संवेदनशील विषयावर प्रशासनाने नागरिकांसाठी अद्याप काही एक खुलासा केलेला नाही. ही गंभीर बाब आहे.

 याबाबत तातडीने – त्वरित – आपत्ती व्यवस्थापन व टंचाई प्राधान्य गृहित धरून चौकशी करावी. त्यातील दोषींवर कर्तव्यात कसुरी बाबत कठोर कारवाई करावी. या सर्व प्रकियेची माहिती पाणी टंचाईने बाधित  धुळेकर नागरिकांना विशेष पत्रकार परिषद घेवून  अवगत करून द्यावी. असे त्यांनी म्हटले आहे. या निवेदनाची प्रत,

प्रधान सचिव ( मनपा )नगर विकास विभाग यांनाही पाठविण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या