संपादकीय,,,,,,,,
नरडाणा :- दि.२७/०४/२०२४ रोजी सकाळी ०९:३० वा.चे सुमारास नरडाणा पोलीस स्टेशन येथे डायल ११२ वर कार्यरत असलेले पो.ह.क्र.८८७ / नारायण गवळी व पोकौं । ९९४ विनोद कोळी यांना डायल ११२ वर कॉल आला की फिरोज मेहमुद पटेल रा.जातोडा ता.शिंदखेडा जि.धुळे हा इसम तापी पुलावर जाऊन आत्महत्या करीत आहे असे कळल्याने डायल ११२ वर कार्यरत असलेले पो.ह.क्र.८८७ / नारायण गवळी व पोकाँ / ९९४ विनोद कोळी चा.पो. काँ/१५१६ अशोक पाटील हे शासकीय वाहन क्र. M.H.१८.B.R. ५४२१ वर तात्काळ रवाना होऊन तापी नदीच्या पुलावर आत्महत्या च्या तयारीत असलेले फिरोज मेहमुद पटेल वय- ३३ रा.जातोडा ता.शिंदखेडा जि. धुळे. यांना अडवुन थांबविले व त्यांची विचारपुस केली असता त्यांचा पती पत्नी चा कौटुंबीक वाद होता रागा च्या भरात आत्महत्या करायला जात होतो. असे सांगितल्याने त्यास नरडाणा पोलीस स्टेशन ला आणुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे सो.यांच्या समक्ष उभे केले असता त्यांनी त्याचे मन परिवर्तन करुन त्याचे वडील मेहमुद वजीर पटेल व पत्नी नरसीन फिरोज पटेल यांच्या ताब्यात दिले.
नरडाणा पोलिसांच्या प्रयत्नांमुळे एका इसमाचे प्राण वाचले त्यामुळे पटेल कुटूबातील सर्वांनी नरडाणा पोलिसांचे आभार मानले,,,,,