13.6 C
New York
Thursday, October 10, 2024

Buy now

जोरदार शक्तिप्रदर्शन करत डॉ.सुभाष भामरे यांचा अर्ज दाखल-शिंदखेडा शहरातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित*

प्रतिनिधी :-भूषण पवारशिंदखेडा : – धुळे येथील भाजपा लोकसभा निवडणूक कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत रथयात्रा काढून धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला.यावेळी धुळे शहराच्या विविध भागांतील भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे,आरपीआय आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.प्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन व मा आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी सदर रथयात्रेत सहभागी झाले होते.
शिंदखेडा शहरातून गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्ते सकाळीच धुळे येथे रवाना झाले होते.डॉ.सुभाष भामरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,अबकी बार 400 पार यासारख्या घोषणा देत गाड्यांचा ताफा धुळ्याकडे रवाना झाला होता.प्रत्येकाच्या हातात आपापल्या पक्षाचे झेंडे होते तर प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची टोपी व मफलर परिधान केले होते. यावेळी शिंदखेडा शहरातील साईलीला नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विर एकलव्य नगर, कॉलनी परिसर, गांधी चौक,माळीवाडा तसेच शिंदखेडा शहरातील विविध परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने धुळे येथील पदयात्रेत सहभागी झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!