-1.6 C
New York
Thursday, January 16, 2025

Buy now

spot_img

शिंदखेडा तालुक्यातील परसामळ सह बाभळे येथे तब्बल पाच घरफोड्या-लाखोंचा ऐवज लंपास- पोलीस प्रशासन सुस्त

*शिंदखेडा तालुक्यातील बाभळे सह परसामळ येथे तब्बल पाच घरफोडी-लाखोंचा ऐवज लंपास*

प्रतिनिधी – भूषण पवार

शिंदखेडा  :- तालुक्यातील परसामळ येथे चोरट्यांनी धाडसी चोरी केल्या असल्याचे वृत्त आहे. चोरट्यानी घरफोडी करत रोख रकमेसह दागिने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.चोरट्यांनी परसामळ गावातील तुकाराम हिलाल पाटील यांच्या घरात ठेवलेले तीन तोळा सोने व अंदाजे 80 हजार रुपये रोकड तसेच दहा भार चांदी घर फोडून चोरी केली असल्याचे घरमालकांनी सांगितले आहे. तर बाभळे या गावात पहाटे तीन च्या सुमारास दिलीप दाजू भील व प्रविण रूपनर यांच्या दुकानातून प्रत्येकी 30 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल चोरी झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.शिंदखेडा रेल्वे स्टेशन या ठिकाणी पार्क केलेली दुचाकी क्रमांक MH 18 AT 1928 ही बाईक शिंदखेडा रेल्वे स्टेशन वरून चोरी झाली आहे.दिनांक 24 जुलै 2024 रोजी पहाटे तीन च्या सुमारास परसामळ गावात चोरट्यांनी डल्ला टाकत धाडसी घरफोडी केल्या आहेत त्याच्यात परसामळ येथे 5 तर बाभळे येथे एक दुकान फोडले आहे. परसामळ येथील शिवाजी दौलत कोळी यांच्या घरातून 90 हजार रुपये रोख रकम व साडेतीन तोळे सोने लंपास केले आहे तसेच तुकाराम हिलाल पाटील यांचे घराचे दरवाजे तोडून घरातील वस्तूंची नासधूस केली आहे.पुढे केदार भटसिंग गिरासे यांचा घराचा दरवाजा तोडून कपाटी उघडल्या पण हाती काही लागले नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.लखेसिंग चंद्रसिंग गिरासे यांचे घराचे दरवाजे उघडून कपडे अस्ताव्यस्त केले असून बारकू लाला कोळी यांच्या घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला व त्याच सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातील दुचाकी सुद्धा चोरट्यांनी चोरून नेली आहे. शिंदखेडा पोलीस स्टेशनला सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़.घटनेचा पुढील तपास सुरु आहे़.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!