22.6 C
New York
Thursday, June 20, 2024

Buy now

spot_img

निकाला आधीच खा.डॉ.सुभाष भामरे अभिनंदन करणारे बॅनर शिंदखेडा शहरात झळकले,,

निकाला आधीच खा.डॉ.सुभाष भामरे अभिनंदन करणारे बॅनर झळकले भाजपा उपाध्यक्ष राहुल निकम व दादा मराठे शुभेच्छा बॅनरची शहरात एकच चर्चा..

साप्ताहिक बातमी वेध

शिंदखेडा :- भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीत ‘अब की बार चार सौ पार’चा नारा देत. नुकतेच एक्झीट पोलचे कल त्याच दिशेने जाहीर झाले; यात भाजपा आणि एनडीएची एक हाती सत्ता येताना दिसत आहे. धुळ्यातूनही डॉ.सुभाष भामरे हे तिसऱ्यांदा खासदार होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. डॉ.सुभाष भामरेना सर्वाधिक मताधिक्क शिंदखेडा विधानसभा क्षेत्रातून मिळेल असा अंदाज शिंदखेडा तालुक्याचे पाणीदार आमदार मा.मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले आहे.उद्या मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, तत्पुर्वीच भाजपा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष मा.राहुल निकम आणि श्री.दादा मराठे यांनी डॉ.सुभाष भामरे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसे बॅनर शिंदखेडा शहरात लावण्यात आले असून या
बॅनरने अनेकांचे वेधून घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. धुळ्यातून डॉ.सुभाष भामरे हे तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ‘अब की बार फिर सुभाषबाबा खासदार’ हा नारा स्थानिक व शिंदखेडा तालुक्यातून सर्व स्तरावरून बुलंद करण्यात आला होता. मतदाना नंतर डॉ.सुभाष भामरे विजयी होतील असा दावा भाजपातर्फे करण्यात आला. आता एक्झीटपोलचे अंदाज खुले झाले असून धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे विजयी होतील व ते प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा पराभव करतील; . तसे पाहता उद्याच निकालानंतर विजयी उमेदवार कोण हे स्पष्ट होईल.

Related Articles

ताज्या बातम्या