-1.6 C
New York
Thursday, January 16, 2025

Buy now

spot_img

शिंदखेडा येथे भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन,,,

*शिंदखेडा येथे भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन,,,,,

शिंदखेडा प्रतिनिधी -भूषण पवार

शिंदखेडा :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले.अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती मात्र मनुस्मृति दहन करत असताना आव्हाड यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं.यामुळे भाजप आक्रमक झाले आहे.शिंदखेडा शहर भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेस जोडे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी भारत माता की जय, या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय खाली डोके वरती पाय अशा पद्धतीच्या घोषणा देऊन फोटोला चपला मारण्यात आल्या.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील चौफुलीवर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारून तसेच निषेधात्मक घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला.यावेळी बोलताना भाजपा शिंदखेडा शहराध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले की,जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान श्री रामचंद्र यांचा अपमान केला होता,भारतीय संस्कृती आणि समाजाशी निगडित लोकांचा ते सतत अपमान करत आहेत.त्यांची जेवढी समज व त्यांच्या मनातील बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेला रोष बाबासाहेबांचा फोटो फाडल्याने स्पष्ट झाला आहे.त्यामुळे भाजपा शिंदखेडा शहराच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.
यावेळी भाजपा शिंदखेडा शहर अध्यक्ष अँड.विनोद पाटील, सरचिटणीस भुपेंद्रसिंह राजपूत,संजयकुमार महाजन, शहर उपाध्यक्ष मिलिंद पाटोळे,संदिप गिरासे,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुरज देसले,मा. पं. स.सदस्य सुभाष आबा माळी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल देसले,भूषण पवार, (फौजी). मा.नगरसेवक बाळासाहेब गिरासे ,प्रवासी संघटनेचे दादा मराठे,गुलाब सोनवणे, मिलिंद पाटोळे,रवींद्र माळी,विकास सोसायटी संचालक रमेश नाना भामरे, दगा बापु चौधरी आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!