24.1 C
New York
Thursday, June 20, 2024

Buy now

spot_img

आण्णासाहेब एन. डी. मराठे विद्यालय माध्यमिक शालांत परीक्षेचा 100 टक्के निकाल*

*आण्णासाहेब एन. डी. मराठे विद्यालय माध्यमिक शालांत परीक्षेचा 100 टक्के निकाल*

प्रतिनीधी – भूषण पवार

शिंदखेडा :- स्वराज्य प्रतिष्ठान संचालित आण्णासाहेब एन.डी. मराठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्च- 2024 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत तनुश्री बबन मंगळे- 93.80% गुणांसह विद्यालयात प्रथम तर द्वितीय रोशनी विनोद नगराळे 92.20% व तृतीय धनुष्का विनोद पवार 91.80% आल्या आहेत.शैक्षणिक वर्ष-2023/24 मध्ये माध्यमिक शालांत परीक्षेसाठी आण्णासाहेब एन. डी. मराठे विद्यालयातून एकूण 166 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी 148 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर 18 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यासह शाळेने 100% निकालाची उज्वल परंपरा अबाधित ठेवली आहे.शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री साहेबरावजी मराठे तसेच सिनेट सदस्य तथा मुख्याध्यापक श्री अमोल मराठे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या