20.8 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

माजी मंत्री व धुळे जिल्हा पालकमंत्री असलेल्या डॉ.ताईस काही प्रश्न,,,,

संपादकीय,,,,

मा.डॉ.ताई
सप्रेम सस्नेह नमस्कार,,,,,,
आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे,आमदार होते नंतर मंत्री होते,परंतु गेली 14 वर्षे आपण धुळे जिल्ह्यात कधी फिरकला नाहीत आणि अचानक लोकसभेचा बिगुल वाजला आणि आपण चक्क धुळ्यात उमेदवारी घेऊन आमच्या जिल्ह्यातील  नेत्यांवर अन्याय केला,
तालुक्यातील एक पत्र वायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील एका तरुणांच्या माध्यमांतून महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदारांच्या माध्यमातुन काही प्रश्न विचारले आहेत.

डॉ.ताई आपण नाशिक मध्ये राहून नाशिक ची उमेदवारी आपणास मिळाली नाही,,ताई आपल्या मंत्री पदाचा कार्यकाळात आपण केलेले उल्लेखनीय  सामाजिक ई.कार्य काय, ते जरा धुळे जिल्हातील सर्वसामान्य जनतेला सांगावे,

खालील प्रश्न हे एका सर्व सामान्य व्यक्तीने विचारले आहेत
त्याची उत्तरे आपण नक्की द्याल ?

शिंदखेडा तालुक्यातील जनतेचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही प्रश्न

1) पालकमंत्री असताना धुळे जिल्ह्यातील काम काय?

2) राज्यात मंत्री असताना महत्वपूर्ण निर्णयात घेतलेला सहभाग?

3) मंत्री असताना विधानसभेत मांडलेल प्रश्न ?

4) 2009 नंतर धुळ्यात का फिरकले नाहीत?

5) आपण पक्षाच्या जिल्हा प्रभारी आहेत तर जिल्ह्यातील नेत्यांना डावलून आपण का उमेदवारी घेतली?

6) आपली राजकीय महत्वाकांक्षा अपूर्ण आहे का?

7) जिल्ह्यातील नेत्यांवर हा अन्याय नाही का?

8) आपण धुळे जिल्ह्यात केलेले आणि शिंदखेडा तालुक्यात केलेले एखादे मोठे काम दाखवा?

9) पालकमंत्री असताना किती निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरला?

10) शिंदखेडा तालुका हा नेहमी दुष्काळी असतो आपण पालकमंत्री असताना पालकत्व म्हणून शिंदखेडा तालुका नाही दिसला, ?

11) मालेगाव MIDC मध्ये किती उद्योग आपण नवीन आणले?

12) बागलाण चा पाणी प्रश्न आपले योगदान काय?

13) धुळे ग्रामीण मध्ये किती गावात आपण निधी दिला?

14) आरोग्याच्या दृष्टीने काय नवीन धोरण आपण आणले?

15) मंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यात व केंद्रात आपली सत्ता होती तेव्हा नाही का आपणास प्रकाशा-बूराई उपसा सिंचन योजना दिसली ?

✍️धुळे लोकसभा क्षेत्रातील सर्वसामान्य मतदार जनतेला पडलेले प्रश्न आहेत………………………..

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!