20.9 C
New York
Thursday, September 19, 2024

Buy now

नगर येथे आयोजित राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत कार्तिक मराठे याने पटकावले रजत पदक*

प्रतिनीधी – भूषण पवार 

शिंदखेडा :- नगर येथे वाको इंडिया महाराष्ट्र द्वारा दिनांक 3 ते 5 मे दरम्यान राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेत आडगाव येथील कार्तिक हरिचंद्र मराठे या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याने रजत पदक पटकावले आहे.तो 37 किलो वजन व 15 वर्ष वयोगटात खेळला.शिंदखेडा येथील प्रवीण सुनील मराठे हे त्यांचे मावसा आहेत त्याच्या या यशाबद्दल शिंदखेडा येथील गाढे परिवारात आनंदाचे वातावरण आहे तर आडगाव येथील मराठे परिवारात सुद्धा मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.
पवित्र देवस्थान आई श्रीमनुदेवी मंदिर असलेले आडगाव तालुका यावल येथील कार्तिक हा फळबाग शेतकरी हरिचंद्र नारायण मराठे यांचा चिरंजीव आहे.शिक्षणासोबतच खेळाची देखील आवड असलेला कार्तिक सरावासाठी भुसावळ येथील स्पोर्ट क्लब मध्ये जात होता. त्यादरम्यान जिल्हास्तरीय स्पर्धेत भुसावळ येथे किक बॉक्सिंग प्रकारात त्याने सुवर्णपदक मिळवीले आहे.पुढे जिद्द आणि चिकाटी न सोडता नगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत रजत पदक मिळवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.स्पर्धेदरम्यान धाडस व ध्येय डोळ्यासमोर ठेवत झालेल्या दोघी स्पर्धेत एक सुवर्ण व एक रजत पदक मिळवून यश संपादन केले.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत असून समाज व परिवारातर्फे त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

चिरंजीव कार्तिक ला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्याच्या जिद्द व चिकाटीमुळे त्याला सदर यश संपादन करता आले. त्याच्या या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यास खेळाबरोबर शिक्षणाची देखील आवड होती इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्यासाठी तो सलग दहा किलोमीटर सायकलने प्रवास करत होता व तो कोर्सही त्याने उत्कृष्टपणे पूर्ण केला.आमच्या गाढे परिवारातर्फे त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा.
(प्रवीण सुनील मराठे,मावसा,शिंदखेडा)

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!