16.6 C
New York
Thursday, October 10, 2024

Buy now

चिमठाणे येथील भाजपा कार्यकर्त्याने मांडलेली वास्तविक भूमिका,,,,

आता मा.मोदींजी कडून अपेक्षा भंग होऊ नये हाच मुद्दा आहे तेवढं व्हावं नाहीतर ही भाजपची शेवटची संधी असेल,,,,,,
💥एक गोष्ट समजत नाही शेतकरीच का मारला जातोय
आपण देश हितासाठी मोदींजीकडे बघून भाजपला मतदान करू,कारण आता मोबाईल मुळे देशात जगात काय चालू आहे सर्व समजत,पण साध्या साध्या गोष्टी कळत नाहीयेत की,आपल्या देशात शेतमाल खरंच कवडीमोल का होतोय?अशी कोणती समस्या किंव्हा अडचण असते की,जो माल निघायला सुरुवात होते नेमकी त्याचं मालाची निर्यात बंदी होते नाहीतर निर्यात शुल्क वाढवले जाते म्हणजे अर्थशास्त्र पाहिलं तर निर्यात शुल्क वाढीमुळे परत त्या मालाचे भाव कमी होतात परिणामी शेतकऱ्याचे नुकसान होते,बरं ते निर्यात शुल्क वाढवण्यामागे एकच कारण असते की,तो माल बाहेर देशात जाऊ नये म्हणजे देशातच राहून त्याची किरकोळ बाजारात किंमत कमी व्हावी म्हणजे उच्च,मध्यम आणि शेवटच्या घटकापर्यंत त्या मालाची किंमत कमी राहून त्या मालाची आवक आणि भाव यांचा समतोल रहावा,💥पण समतोल मुळे माल पिकवणाऱ्याचे आत्महत्येस प्रवृत्त होणे क्रमप्राप्त ठरते,कारण आज मजुरी,बियाणे, खते वगैरे सर्व हिशोब केला तर शेतकऱ्याचे खरंच हाल आहेत,पण आपण भाजपा चे कट्टर समर्थक आहोत म्हणून स्वपक्ष आणि मा. पंतप्रधान मोदींना कसं काय आरोपी करायचं?पण मनात खदखद आहेच म्हणून सांगतोय,आणि मी जे बोलतोय ते प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याच्या मनात आहे फक्त बडे धेंड सोडले तर प्रत्येकाच्या मनात आहे की,10 वर्षात जे अपेक्षित होत ते मोदींनी केलं नाहीये,फक्त राष्ट्र आणि धर्म सुरक्षा या दोनच मुद्द्यांवर मी तरी मोदी सोबत आहे.
💥मोदींनी शेतकऱ्याला लागणाऱ्या वस्तू म्हणजे शेतीशी निगडीत औजारे, खते,बियाणे,पशुखाद्य,अशा गोष्टींना GST लावूच नये आणि त्यातपण खरेदी किमतीच्या 40 % अनुदान प्रत्येक गोष्टीत दिले पाहिजे.
💥 स्वामीनाथन आयोगाच्या एम एस पी सोडून काही शिफारशी अमलात आणणं शक्य नाही हे आम्हाला कळतंय,कारण त्यात भविष्यातील भौगोलिक ,वातावरणीय बदल आणि अनेक गोष्टींचा विचार न करता एखाद्या आक्रस्ताळी माणसाने कराव्यात अशा तरतुदी आहेत.💥मागच्या वर्षी जे किसान कायदे आणले होते ते सक्तीने लागू केले पाहिजेत त्या आधी शेतकऱ्यांना ते समजवले पाहिजेत नाहीतर शरद पवार उद्धव आणि पटोले सारखे हितशत्रू नाशवंत बुद्धीचे लोक उगाच विष पसरविण्याचे काम करतील💥💥💥💥सर्वात आधी कृषी खात्याचा स्पेशल बजेट सादर झाला पाहिजे आणि दरवर्षी त्यात रेडिरेकनर प्रमाणे वाढ झाली पाहिजे💥दरवर्षी ज्या 24 पिकांचे निर्धारित बाजार मूल्य ठरवले जाते त्याच्या पेक्षा कमी किमतीत शेतीमाल खरेदी केला जातो,त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने शेतकरी नाशवंत माल पडेल भावात विक्री करतो,कायम स्वरुपी तोडगा काढून शेतकरी नुकसान टाळले पाहिजे,10 वर्ष खूप असतात एखाद्या गोष्टीच्या मागे लागून तिच्या उच्च स्तरावर नेण्यासाठी,पण दुर्लक्षित मानसिकतेमुळे हे शेतकऱ्याचे हाल आहेत,आम्हाला मोदींकडून मिळणारे ते 6000 पण नको म्हणजे त्याच असाय की,जे लोक मजा करतायेत ते तसेच मजा करतायेत आणि ज्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्था सुधारेल तो शेतकरी आत्महत्या करतो हे चुकीचं आहे म्हणजे काही लोकांना लाखो मध्ये पगार शून्य काम असताना आधी या अशा रिकाम्या लोकांचे पगार कमी व्हायला पाहिजे म्हणजे तेवढ्या पैशाने राज्याला द्यावा लागणारा GST चा हिस्सा केंद्राला वाचवता येईल कारण शिक्षण खात राज्याचं असत.
💥गोहत्या आणि वृक्षतोड हे गुन्हे 302 सारख्या कलमात आणून तशी अंमलबजावणी व्हावी हीच अपेक्षा आहे 💥💥💥आपल्याच जिल्हा तालुक्याची परिस्थिती पहा, अक्कल्पाडा,वाडी शेवाडी, जामफळ (आता पूर्ण होतंय आणि ते बाबा भामरे यांच्या अथक प्रयत्नामुळे होतंय म्हणून त्यांना परत एक संधी द्यायला पाहिजे), प्रकाशा बुराई यासारख्या प्रकल्पावर अनेक वर्ष राजकारण झालं आणि चालू आहे.
💥आता आपल्याच तालुक्यात (शिंदखेडा)प्रकाशा बूराई योजना अवघ्या 750 कोटीची योजना आहे पण तेवढी सुद्धा 10 वर्षापासून होत नाहीये नुसताच आपलं आपलं म्हणून उपयोग नाहीये,तापी मधून निदान या उन्हाळ्यात तरी बुराई नदी मध्ये पाणी पडले पाहिजे होत पण नाहीच झालं,मधले अडीच ,वर्ष त्या आधीच्या सरकारचे सोडले तर सर्व सत्ता आपल्याकडेच होती मग अडथळा कुठे आहे,पूर्ण तालुका 100%बागायत झाला असता पण नाहीच आणि जो बोलेल त्याचे तोंड दिसेल,दुसऱ्या कोणत्याही योजना आनल्या नसत्या तरी चाललं असतं फक्त ती एकच योजना होताच सर्वच विषय संपले असते.वाईट वाटतं असो,
💥पण असे आहे की, सवत पण चांगली नाही,दुसऱ्या पक्षांची वैचारिकता अजिबात आपल्याला चालत नाही, मा.मोदींनी काय आपल्याला सोन्याचं अंडं दिलेलं नाही पण शरद पवार,उद्धव ठाकरे आणि काँग्रेस म्हणजे फक्त धर्मवाद,जातीवाद बाकी काहीच नाही यांच्या अंगात ,म्हणून तिकडे फिरकने पण शक्य नाही,पण कधी कधी वाटतं सर्व सोडावं राजकारण चुलीत घालावं,कोनाला पडलेली आहे मग आपल्यालाच का चालत नाही,तसही करून पाहिलं पण जो पुस्तक वाचतो त्याला चैन पडत नाही.
सर्वांनी एवढंच लक्षात ठेवा झुलवत ठेवल्या गेलेल्या योजना लगेच व्हाव्यात एवढीच अपेक्षा,,,,.

भाजपा कार्यकर्ता मा.योगेंद्रसिंग राजपूत

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!