प्रतिनिधी – भूषण पवार
शिंदखेडा :- शिंदखेडा येथील रहिवासी असलेला तसेच नगाव इंजिनिअरिंग कॉलेजला शिक्षण घेतलेला विद्यार्थी,शिंदखेडाचा सॉफ्टवेअर अभियंता शरद यशवंत पवार यांची अमेरिका येथील कंपनीत नवीन प्रोजेक्ट च्या कामा संदर्भात निवड करण्यात आली आहे.असेंचर कंपनी कडुन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथील नॉर्थ कॅरोलिना मध्ये चार्लोट या ठिकाणी त्यांची निवड झाली आहे.अभियंता शरद यशवंत पवार हे शिंदखेडा येथील कै.किसन शामजी मराठे यांचे नातू तर श्री यशवंत किसन पवार यांचे चिरंजीव आहेत सध्या ते पुणे येथे असेंचर कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत.शिंदखेडा येथील पवार परिवारातून अमेरिकेला निवडीचा मान मिळवलेला अभियंता म्हणून शरद पवार यांची आता ओळख निर्माण झाली आहे.येत्या दोन दिवसात ते अमेरिकेला रवाना होणार आहेत.त्याचे प्राथमिक शिक्षण एल बी एस एच हायस्कूल मनोर, पालघर या ठिकाणी झाले असून माध्यमिक शिक्षण शिरपूर येथील आरसी पटेल कॉलेजला झाले आहे. तर त्यांचे इंजिनिअरिंग नगाव येथील इंजीनियरिंग कॉलेजला झाले आहे. त्याच्या निवडीबद्दल पवार परिवारात खुशीचे वातावरण आहे तर त्याच्या या यशाबद्दल शिंदखेडा येथील माजी आमदार तात्यासाहेब रामकृष्ण पाटील यांनी पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मान केला. व अभियंता शरद पवार यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी माजी आमदार रामकृष्ण पाटील तसेच शरद पवार यांचे वडील यशवंत पवार,भाऊ विनायक पवार, डॉक्टर राजेश वाणी, निखिल वाणी उपस्थित होते.