जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निस्वार्थपणे मतदान करावे,,,,,
✍️✍️🚥🚥✍️✍️
धुळे ;– भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने नि:स्वार्थपणे मतदान करावे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केले.
स्वीप उपक्रमातंर्गत शिंदखेडा विधानसभा मतदार संघ, पंचायत समिती, शिंदखेडा तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांच्यातर्फे सवाई मुकटी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी आर.डी.वाघ, पंचायत समिती, शिंदखेडा येथील नोडल अधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी डॉ. सी. के. पाटील, सहा. गटविकास अधिकारी कपिल वाघ, विस्तार अधिकारी श्री.सोनवणे, श्री.देवरे, श्री.जाधव, सर्व केंद्रप्रमुख यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, तरुण मतदार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यायाधीश संदीप स्वामी म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी निस्वार्थपणे प्रत्येक मतदारांने मतदान करणे आवश्यक आहे. मतदानामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होईल. तसेच आपल्या गावाचा, तालुक्याचा, राज्य आणि देशाचा विकास होईल. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देऊन उपस्थितांचे प्रबोधन केले. त्याचबरोबर शिंदखेडा तालुका दुष्काळग्रस्त असल्याने पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी व्यवस्थापन, वृक्ष लागवड या विषयावर जनजागृती करून गावाची पाणीटंचाई दूर कशी करता येईल याबाबतही मार्गदर्शन केले.
तालुक्याचे स्वीप नोडल अधिकारी डॉ.सी.के.पाटील बोलतांना म्हणाले की,आजच्या कार्यक्रमात सर्वांचा उत्साह पाहून या गावातील मतदान टक्केवारी वाढीसाठी आजचा उपक्रम नक्कीच परिणामकारक ठरेल असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे सोमवारी 8 एप्रिल रोजी देखील सर्व तालुक्यातील प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळेत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायत व शाळेमार्फत आयोजित आजचा कार्यक्रमातून आपल्याला गावातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
प्रस्ताविकात गटविकास अधिकारी अधिकारी श्री. वाघ यांनी मागील निवडणुकीत ज्या गावांतील मतदानाची टक्केवारी कमी झाली त्यातील त्रुटी, कारणे नमुद करून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 100 टक्के मतदान होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीत सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्व मतदारांकडून शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत मी मतदान करणारच असे संकल्प पत्र स्वाक्षरीसह भरून घेण्यात आले. संकल्प पत्र भरून देण्यात आले. यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे. यानंतर पथनाट्यद्वारे मतदान प्रक्रिया, मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सक्षम करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद शाळा, सवाई मुकटी येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदान करण्याचा हक्क प्रामाणिकपणे बजावून 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य पद्धतीने मतदान करून लोकशाही बळकट करण्याचा व गावाचा, देशाचा, विकास साधण्याचा संदेश दिला. तालुक्यातील जिल्हा परीषदेतील शाळेतील शिक्षकांच्या पथकाने पथनाट्य सादर करून सर्व 18 वर्षावरील नव मतदारांची नोंदणी करणे, वोटर हेल्पलाइन ॲप, वयोवृद्ध मतदार, दिव्यांग मतदार यांच्यासाठी मतदानाच्या उपलब्ध सुविधा व टपाली मतदान याविषयी जनजागृती व प्रबोधन केले.
प्रारंभी सकाळी विद्यार्थ्यांची व मतदारांची जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पंचायत समिती, शिंदखेडा येथील नोडल अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी डॉ.सी.के. पाटील सहा. गटविकास अधिकारी कपिल वाघ व विस्तार अधिकारी श्री.सोनवणे, श्री.देवरे, श्री. जाधव, सर्व केंद्रप्रमुख यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, तरुण मतदार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंदाने येथील जिप.शाळेचे मुख्याध्यापक नितिन सासके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसेविका माधुरी पाटील, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भारती क्षीरसागर, रूपांतरित शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील व शिक्षक युवराज एकनाथ पवार , अजय शिवदास चव्हाण, श्रीमती शितल आधार चव्हाण, हरीशचंद्र देसले यांनी परीश्रम घेतले.
या कार्यक्रमास गावातील मतदार, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, तरुण मतदार, सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळ, तामथरे, चिमठाणे केंद्रातील केंद्रप्रमुख, सर्व विभागांचे विस्तार अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक तीनही शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, अशावर्कर, बचत गट, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.