*शिंदखेडा येथे गरीब कार्डधारकांचे धान्याने भरलेली वाहन बेभरोसे – याला जबाबदार कोण ?*
शिंदखेडा प्रतिनिधी .भूषण पवार
शिंदखेडा :- स्वस्त धान्य दुकानांमध्ये दररोज काहीना काही संशयास्पद घटना घडत असल्याचे सांगितले जाते.अनेक क्विंटल धान्य वितरणात गडबड असल्याची चर्चा आहे. शिंदखेडा येथे कुंबरेज रस्त्यावर असलेल्या धान्य गोदामात आज गाडी क्रमांक MH 39 C 1383 या आयशर गाडीत अंदाजे 50 ते 60 क्विंटल धान्य शिंदखेडा शहरात वितरणासाठी लोड करण्यात आले होते सदर गाडीची विचारपूस गोदामकीपर शशी पाटील यांच्याकडे केली असता सदर गाडी शिंदखेडा शहरात धान्य वितरणासाठी भरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सदर गाडी दुपारी 02 वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत शिंदखेडा शहरातील बस स्टँड लगतच्या जुन्या धान्य गोदामा जवळ उभी करण्यात आली असल्याचे आढळून आले.या विषयावर गोदामकीपर शशी पाटील यांच्याशी वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.संध्याकाळी पाच वाजेपासून शहरात पाऊस सुरू आहे व रात्रभर ती गाडी जुने धान्य गोदाम जवळ लावारिस पडलेली असणार असल्याचा अंदाज आहे.म्हणूनच गोरगरीब कार्डधारकांचे धान्य रामभरोसे असून त्याला वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदर धान्य चोरीचे तर नाही ना?अशी संशयास्पद चर्चा नागरिकांतून होत आहे. या प्रकारे धान्याची चोरी खरोखरच होत असेल तर त्यासाठी मालवाहतूक गाडी आवश्यक आहे. यासाठी गोदाम कीपर याच्या संगणमताने चोरी घडवून आणणे शक्य असल्याची चर्चा आहे.