संपादकीय,,,,,,,,,,,,,,
आदर्श आचारसंहिता बाबत,,,,
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होईल, आचारसंहितेचा कालावधी किती दिवसाच्याअसेल, याबाबत सध्या उत्सुकता आहे.सर्वात आधी केंद्रीय निवडणूक आयोगाचे तत्कालीन आयुक्त टी.एन.शेषन यांनी ९० दिवसांची निवडणूक आदर्श आचारसंहिता आणली होती. नंतरच्या काळात तो कालावधी कमी होऊन सध्यस्थितीत ३० दिवसांवर आला आहे.
👉२००४ च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा २४ ऑगस्टला झाली. तेव्हा आदर्श आचारसंहिता ४५ दिवसांची होती.
👉२००९ च्या विधानसभेची घोषणा ३१ ऑगस्ट २००९ रोजी झाली. ही आचारसंहिता ३० दिवसांची होती.
👉२०१४ च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १२ सप्टेंबर २०१४ ला झाली. मतदान १५ ऑक्टोबरला झाले. मतमोजणी १८ ऑक्टोबरला झाली.
👉२०१९ च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा २० सप्टेंबरला झाली होती. २१ ऑक्टोबरला मतदान आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी झाली.
*आचारसंहिता*
आचारसंहिता साधारण किती दिवसांची असेल ?
आचारसंहिता म्हणजे नेमक काय?
• देशात स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम व अटी ठेवलेले असतात. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात.
• निवडणुकीत सहभागी नोदविनाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य असते.
एखाद्या उमेदवाराने किंवा राष्ट्रीय राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केले, तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जात असते.
आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर बाब असेल, तर कायदेशीर गुन्हा उमेदवारावर दाखल केला जातो.
अंमलबजावणी सर्वप्रथम केव्हा करण्यात आली ?
वर्ष १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर १९६७ च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले.