शिंदखेडा :- कामाचा ताण आणि विनापगार काम करणे सहन होत नसल्यामुळे मालपुर येथील संगणक परिचालक राजेंद्र पान पाटील यांनी शिंदखेडा पंचायत समिती येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला गेल्या तीन ते चार महिन्यापासून बिन पगारी काम करून शासनाच्या जाचक अटींमुळे तणावाखाली गेल्यामुळे त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.. वेळीच त्यांना आवर घालून त्यांच्या सहकारी संगणक परिचालक यांनी रोखून धरले आणि कुठलीही जीवित हानी मात्र झाली नाही.
शासनाला वेळीच जाग यावी आणि बारा वर्षापासून काम करत असलेल्या संगणक परिचालकांचा प्रश्न शासनाने आपल्या स्तरावर सोडवावा व आज रोजी ठाणे येथे होत असलेल्या मोर्चाची शासनाने योग्य ती दखल घेऊन संगणक परिचालकास न्याय मिळवून द्यावा हीच या आत्मदहन मागील खरी कैफियत आहे.
संगणक परिचालक राजेन्द्र पानपाटील,मालपुर