सिंचन विहीर,घरकुल योजना लाडकी बहीण योजना बाबत खातेदार यांचे बँक खाते आधार लिंक व ईतर प्रश्न तत्काळ मार्गी लावा.
शिंदखेडा :- तालुक्यातील सिंचन विहीर,घरकुल योजना,लाडकी बहीण योजना बाबत बँक खाते आधार लिंक सह ईतर समस्या मार्गी लावा शेवाळेसह परिसरातील ग्रामस्थांकडून चिमठाणे येथील बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली.तसेच माजी मंत्री श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नांनी सिंचन विहीर,लाडकी बहीण योजना,घरकुल योजना,पीएम किसान नमो सन्मान योजना,दुष्काळ गारपीट व कापूस सोयाबीन योजना इत्यादी योजनांचा आपल्या शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.परंतु आपल्या चिमठाणे शाखेमार्फत उघडलेल्या नागरिकांच्या खात्यांना खूप मोठ्या प्रमाणात कागदपत्रांमध्ये काही अडचण व त्रुटी येत असून ग्राहकांना परत परत आपल्या बँकेत यावे लागत आहे.तसेच नागरिकांच्या बँक खात्यात त्रुटी असल्यामुळे नागरिक परत बँकेत येत असून त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच आपल्या शाखेमार्फत केवायसी आधार पेंडिंग इत्यादी कामांसाठी दोन ते तीन महिने ग्राहकांना फिरावे लागत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.तसेच ग्रामीण भागातील नागरिक देखील आपले कामधंदा सोडून बँकेत येत असून देखील त्यांचे बँकेत काम होत नसल्याने ते नाराजगी व्यक्त करीत आहेत. तसेच वरील शासकीय योजनांचे पैसे शेतकरी लाभार्थी यांच्या खात्यावर जमा झाले असून आपल्या शाखेने त्यांच्या खात्याला होल्ड केले आहे.तसेच त्यांच्या खात्याचे होल्ड लवकरात लवकर काढून घ्यावे अशीही यावेळी सांगण्यात आले. तसेच वरील आठ ते दहा दिवसात समस्या मार्गी न झाल्यास आपल्या शाखेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा चिटणीस शेवाळे गावातील सरपंच बबलू कोळी यांनी सांगितले आहे.यावेळी ,सागर निकम, भारत मगरे,राहुल गिरासे,निखिल बागुल,सचिन माळी,तुषार निकुंम,महेश गोसावी,जगदीश निकुम,हर्षल मासुडे,संग्राम गिरासे,आकाश गिरासे,राहुल जाधव,किरण बागुल,गोपाल माळी,सुनील कोळी,कुंदन माळी,तुषार अहिरे,राहुल गिरासे,राज बागुल,मोहन बागुल,दर्शन बोरसे,प्रशांत देशमुख,दादाभाऊ कोळी,लोकेश देशमुख,जगदीश पाटील,जीतराज कोरगकर आदी शेवाळेसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.