16.6 C
New York
Thursday, October 10, 2024

Buy now

ग्रामपंचायत संगणकपरिचालक मा.मुख्यमंत्र्याच्या ठाणे येथील बंगल्यावर मोर्चा काढणार !*

*येत्या २४ सप्टेंबरला ग्रामपंचायत संगणकपरिचालक मा.मुख्यमंत्र्याच्या ठाणे येथील बंगल्यावर मोर्चा काढणार !*

*राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतीचे काम करणारे संगणकपरिचालक मोर्चात सहभागी होणार !*

*सर्व संगणकपरिचालकांना मुख्यमंत्री ना.शिंदे साहेबाकडून निर्णयाची अपेक्षा असल्याने ठाण्यात मोर्चाचे आयोजन !*

*संगणकपरिचालकांच्या मागण्या मान्य झाल्या शिवाय ठाणे सोडणार नाहीत — सिद्धेश्वर मुंडे*

ठाणे(प्रतीनिधी) ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून १२ वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे किंवा कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने येत्या येत्या मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे २० हजार संगणकपरिचालक मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या ठाणे येथील निवासस्थानावर काढण्यात येत असलेल्या मोर्चात सहभागी होत असून,मुख्यमंत्री मा.शिंदे साहेबच निर्णय देऊ शकतात ही सर्व संगणकपरिचालकांची अपेक्षा असल्याने ठाण्यात मोर्चा काढण्यात येत असून,शासन जो पर्यंत मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत ठाणे सोडणार नसल्याचा निर्धार केला असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की,संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायत मध्ये मागील १२ वर्षापासून संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत.परंतु शासनाने संगणकपरिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे,तसेच मागे संगणकपरिचालकांच्या आंदोलनाची दखल घेऊन १६ मार्च २०२४ रोजी मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ३००० रुपये मासिक मानधन वाढवल्याची घोषणा केली,त्यातच csc –spv या कंपनीचा करार ३० जून रोजी रद्द केला व १९ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प चालवण्यासाठी दिला,परंतु महाआयटीने सदरील प्रकल्प चालवण्यास नकार दिल्याने संगणकपरिचालकांना अद्याप कोणाकडूनही नियुक्ती मिळाली नाही,त्यात ग्रामविकास विभागाने ११ जानेवारी २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे आवश्यक असताना त्याकडे ग्रामविकास विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीकडे मुख्यमंत्री मा.शिंदे साहेबांचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानावर मंगळवारी २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मोर्चा काढण्यात येणार असून,मुख्यमंत्री साहेबच निर्णय घेतील ही अपेक्षा राज्यातील सर्व संगणकपरिचालकांना असल्यानेच ठाण्यात मोर्चा काढण्यात येत असून शासनाने या मोर्चाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा जो पर्यंत ठाणे सोडणार नसल्याचा निर्धार संगणकपरिचालकानी केला असल्याचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!