16.6 C
New York
Thursday, October 10, 2024

Buy now

*शेवाडे येथील खुणाचा अवघ्या काही तासांतच खुलासा – शिंदखेडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.*

प्रतिनिधी – भूषण पवार

शिंदखेडा : – दि १७ सप्टेंबर मंगळवार रोजी तालुका शिंदखेडा गाव शेवाडे येथील तरुण दीपक रतिलाल मालचे (वय २५) हा शेवाडे गावातील जुनी आदिवासी वस्ती लगत असलेल्या शेताच्या बांधलगत झाडाझुडपांमध्ये मयत अवस्थेत मिळून आल्याची बातमी मिळताच शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पीआय बाळासाहेब थोरात व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली.मयत दीपक रतिलाल मालचे याचे गावातील एका महिलेशी प्रेम संबंध असल्याची माहिती मिळून आली व त्या दिशेने योग्य तपास करून शिंदखेडा पोलिसांनी सदरचा गुन्हा अवघ्या काही तासातच उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली.सदर प्रकरणी मयताचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.पोलीस स्टेशन गु र न २५३/२०२४ बी एन एस एस कायदा सन २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे योग्य तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात,पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक पोलीस राजु सूर्यवंशी,उपनिरीक्षक गुलाब ठाकरे, हेमंत फुलपगारे, प्रशांत पवार,अशोक धनगर,अनंत पवार, साबीर शेख,रविंद्र ईशी, कैलास चौधरी,विशाल सोनवणे,रुपेश चौधरी,कैलास पुरोहित,पंकज कुलकर्णी,योगेश शिंदे,अनिल पवार,रजनी पाटील,वर्षा गोपाळ,साक्षी पवार, माधुरी चव्हाण, वैशाली वाहुळे,चेतन माळी, अशांनी मिळून केलेली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!