spot_img
spot_img

शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज चॅनल दिनांक 1 जुलै पासून आपल्या सेवेत,,,,

*शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज चॅनल दिनांक 1 जुलै पासून आपल्या सेवेत*

*बिजासनी मंगल कार्यालयात होणार भव्य शुभारंभ*

शिंदखेडा प्रतिनिधी – भूषण पवार

शिंदखेडा :- शिंदखेडा तालुका व शहर वासियांसाठी एक आनंदाची बातमी,दिनांक 1 जुलैपासून शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज चॅनल शिंदखेडा तालुक्यात सुरू होत असून हे एक व्हिडिओ शेअरिंग वेबसाइट यु ट्यूब चेनल आहे.हे सामाजिक माध्यम ऑनलाइन व्हिडिओ पाहणे सोपे करते.पत्रकारांसाठी युट्युब चॅनेलचे महत्त्व वाढले आहे.सध्याची पत्रकारिता ही आता डिजिटल पत्रकारिता झाली आहे.लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याचे माध्यम आता डिजिटल झाले आहे.पत्रकारितेच्या जगात मुख्य प्रवाहातील माध्यमांशिवाय इतर अनेक पर्याय उदयास आले आहेत.या सर्व पर्यायांमध्ये पत्रकारितेसाठी YouTube हा एक महत्त्वाचा पर्याय म्हणून उदयास येत आहे. म्हणूनच शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज चैनल ची निर्मिती करून आपल्या सेवेसाठी नवीन चॅनल सुरू करत आहोत.यूट्यूब चेंनेल चे डिजिटल युगात अनन्य साधारण महत्त्व आहे. तुमचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचवने हा या चॅनेलचा मुख्य उद्देश आहे .YouTube वर दररोज सर्वाधिक व्हिडिओ पाहिले जातात.समाज सुधारण्यासाठी संदेश योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युट्युब चॅनेल चा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो.संस्कृतीच्या देवाणघेवाणीसाठी एक सशक्त माध्यम म्हणून,तसेच विविध आवाजांना प्रोत्साहन देण्याचे काम या चॅनल द्वारे केले जाणार तसेच या चॅनलचा प्रचार व प्रसार भविष्यात खानदेश व पूर्ण महाराष्ट्रात केला जाणार असल्याचे मुख्य संपादकांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!