*जनता हायस्कूल शिंदखेडा येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!*
*श्री. जतीन बोरसे यांचे त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंती निमित्ताने हृदयस्पर्शी उद्बोधन…!!*
प्रतिनीधी – भूषण पवार
शिंदखेडा :- जनता हायस्कूल कला विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्राथमिक विद्यामंदिर शिंदखेडा येथे त्याग मूर्ती महामानवाची सावली रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य आण्णासो. श्री. एस. एस. पाटील यांच्या हस्ते रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व फुलहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य श्री. एस. एस. पाटील, पर्यवेक्षकर श्री. बी. जे. पाटील, वरिष्ठ लिपिक किशोर पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. एच. सोनवणे, श्री. एस. के. जाधव. ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. एन. जे. देसले व श्रीमती व्ही. एस. पाटील आदी उपस्थित होते
त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाचे उपशिक्षिक श्री. जतीन बोरसे यांनी विद्यार्थ्यांना रमाई यांच्या जीवनाची कथेची ओळख करून देत असताना *”जीवभर संषर्घ सोसुन बाबासाहेबांना त्यांच्या कार्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या, खंबीरपणे साथ देणाऱ्या, दिव्यशक्ती व दिनदुबळ्यांची माय माऊली अशी माझी रमाई माऊली होती..”* असे हृदयस्पर्शी उद्बोधन उपशिक्षिक श्री. जतीन बोरसे यांनी केले तसेच रमाई यांच्या बालपणापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी लग्न झाल्या पर्यंतच्या अनेक घडामोडींचा उजाळा सर्व विद्यार्थ्यांना करून दिला
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. डी. एच. सोनवणे तर आभार श्री. एस. के. जाधव यांनी मानले सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू – भगिनी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते