*नगरपंचाय शिंदखेड्याच्या वतीने घर – घर संविधान कार्यक्रमांतर्गत आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा जनता हायस्कूल शिंदखेडा येथे उत्साहात साजरा.*
शिंदखेडा:- नगरपंचायतीच्या वतीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा शहरात घर घर संविधान कार्यक्रम अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दिनांक 23 जानेवारी रोजी नगरपंचायतीच्या वतीने शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात साजरी झाली नगरपंचायतीच्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुमारे अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून प्रथम, द्वितीय व तृतीय येणारे विद्यार्थ्यांचा नगरपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ यांच्या सूचनेनुसार प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नेमण्यात आले होते. त्यात नगरपंचायतीचे पाणीपुरवठा इंजिनियर विपुल साळुंखे, लेखापाल दिनेश बागुल, कर निरीक्षक गणेश पवार, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी, इंजिनीयर अमरदीप गिरासे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. तसेच शहर समन्वयक रविंद्र पाटील व सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिनेश फुलपगारे यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आण्णासो. श्री. एस. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री. बी. जे. पाटील, वरिष्ठ लिपिक श्री. किशोर पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. एच. सोनवणे, श्री. एस. के. जाधव, श्री. एस. ए. पाटील, श्री. एल. पी. सोनवणे व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एन. जे. देसले आदी उपस्थित होते तसेच प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी नगरपंचायत सर्व कर्मचाऱ्यांनी व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू – भगिनी यांनी परिश्रम घेतले