सोनगीर महाविद्यालयाचा *राष्ट्रीय सेवा योजना* शिबिराचा समारोप..
सोनगीर : – येथील बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांचे मौजे देवभाने जि.धुळे येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ‘युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी’ या संकल्पनेनुसार संपन्न झाला.
प्रसंगी समारोपकर्ते नरडाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीणसिंग गिरासे यांच्या खास उपस्थितीत संपन्न झाला. सोबत संस्थेचे अध्यक्ष श्री. अमृतरावजी केशवरावजी कासार,संस्थेचे पदाधिकारी श्री.दंगल वामन दंगल,डॉ. आर.व्हि.पारेख,श्री. सत्तारखा पठाण,श्री. मुरलीधर चौधरी,श्री.गौरव कासार,उपप्राचार्य डॉ. आर.जी.खैरनार,अधीक्षक श्री.संदीप अमृतराव कासार,श्री.एल. एन.पाटील,श्री.एस.एस. पाटील,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.व त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर शिबिरात दि.७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत ग्रामस्वच्छता,मतदार जागृती,पर्यावरण, प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित केली होती. तसेच स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी श्रमदान मोठ्या प्रमाणावर केले.
*प्राचार्य डॉ.प्रवीणसिंह गिरासे* यांनी सांगितले की,राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात संयम महत्त्वाचा असतो.त्यातूनच विद्यार्थी चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष व बौद्धिक गुण संपादन करून आपली प्रतिमा निर्माण करीत असतो.आणि शेवटी असे विद्यार्थी आपल्या जीवनात समर्पित भावनेने निष्ठापूर्वक जगून नितीवान माणूस म्हणून ओळखले जातात.*श्री.अमृतराव कासार* यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून स्वयंसेवक विद्यार्थी यांनी समाजसेवक व समाजप्रिय म्हणून आपली प्रतिमा स्वच्छ ठेवावी.असे सांगितले. *प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद पाटील* यांनी आपल्या भाषणात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी शिबिरातून मिळालेल्या बौद्धिक विचारसरणीतून उत्तम जीवन जगा.असे सांगितले.तसेच *श्री. मुरलीधर चौधरी* यांनीही मनोगत व्यक्त केले.तसेच स्वयंसेवक विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त केलीत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.डी.आर.पाटील व डॉ. आर.के.जाधव यांनी केले. तर अहवाल वाचन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ.एस. आर.राणे यांनी केले. शिबिर यशस्वीतेसाठी श्री. जयपाल गिरासे,भटू देसले,पंकज देसले,रिंकू देसले,कु.श्वेता गवळे यांनी विशेष सहकार्य केले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,कर्मचारी, ग्रामस्थ,स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
—————+————–
प्रसिद्धी प्रमुख- डॉ.आर.पी. नगराळे
डॉ.ए.बी.पाटील
प्रभारी प्राचार्य