4.7 C
New York
Friday, February 7, 2025

Buy now

spot_img

*जनता हायस्कूल शिंदखेडा येथे भूगोल दिन व राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा

*जनता हायस्कूल शिंदखेडा येथे भूगोल दिन व राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा…!!*

प्रतिनीधी – भूषण पवार

शिंदखेडा :- जनता हायस्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे दरवर्षाप्रमाणे 14 जानेवारी रोजी *भूगोल दिन* साजरा केला जातो या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना भूगोल विषयाची माहिती शाळेतील भूगोल शिक्षक श्री. जे. डी. बोरसे यांनी भूगोल दिनाचे महत्त्व पटवून दिले तसेच भूगोलाचे महर्षि डॉ. सी. डी. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त भूगोल दिनाचे प्रास्ताविक केले त्यांनी भूगोल विषय हा स्पर्धात्मक विषय असून 14 जानेवारी रोजी होणा-या मकरसंक्रमणात सूर्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते म्हणून हा दिवस *भूगोल दिन* म्ह्णून साजरा केला जातो असे श्री. जे. डी. बोरसे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना संबोधित यांनी केले.
तसेच 15 जानेवारी स्वतंत्र भारताचे प्रथम कुस्तीपटू स्व. खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त *राज्य क्रीडा दिन* म्हणून साजरा केला जातो यानिमित्त स्व. काशाबा जाधव यांच्या जीवनकार्याची कार्याची उजळणी विद्यार्थ्यांना करून दिली भूगोल शिक्षक श्री. जे. डी. बोरसे यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले कि, जाधव हे स्वतंत्र भारताचे वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारे प्रथम कुस्तीपटू होते यानंतर उपशिक्षिका श्रीमती जे. एस. निकम यांनी भोगी या सणाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व श्रीमती पि. यू. पवार यांनी मकरसंक्रांतीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व भूगोल शिक्षक श्री आर यु पाकळे यांनी भूगोल या विषयाची सखोल भूकंप, ज्वालामुखी, ग्रह व तारे याविषयी माहिती विद्यार्थ्यांना करून दिली व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एस. ए. पाटील यांनी मकरसंक्रांत सणांची ओळख सर्व विद्यार्थ्यांना करून दिली या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे *प्राचार्य आण्णासो. श्री. एस. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री. बी. जे. पाटील, वरिष्ठ लिपिक श्री. किशोर पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. के. जाधव, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एन. जे. देसले व श्रीमती व्ही. एच. पाटील* आदी मान्यवर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू – भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपशिक्षक श्री. जे. डी. बोरसे यांनी मान्यवरांचे आभार मानले अतिशय उत्साहात व आनंदात भूगोल दिन व राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!