-3 C
New York
Thursday, January 16, 2025

Buy now

spot_img

*जनता हायस्कूल व गायत्री माता प्राथ. विद्यामंदिर शिंदखेडा येथे शिक्षक – पालक मेळावा तसेच आनंद मेळावा उत्साहात संपन्न.

*जनता हायस्कूल व गायत्री माता प्राथ. विद्यामंदिर शिंदखेडा येथे शिक्षक – पालक मेळावा तसेच आनंद मेळावा उत्साहात संपन्न..!!*

शिंदखेडा :- जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्राथमिक विद्यामंदिर शिंदखेडा येथे सुरुवातीला सकाळी ठीक आठ वाजता पालक शिक्षक यांच्यात सुसंवाद असावा, पालकांच्या आपल्या मुलांविषयीच्या अपेक्षा शिक्षकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शिक्षक – पालक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, स्वागत गीत व सरस्वती माता पूजनाने झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष श्री मनोहरजी गोरख पाटील,ताईसो. सौ. मीराताई मनोहर पाटील, सचिव बापूसो श्री. देवेंद्रजी पोपट बोरसे खजिनदार, ज्येष्ठ संचालक आबासो श्री गोरख राघो पाटील, भैय्यासाहेब प्रा.श्री जितेंद्रजी पाटील, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. एन. एस. कासार, सहसचिव श्री मनोहर राजपूत यांच्यासह विद्यालयाचे प्राचार्य श्री एस एस पाटील, पर्यवेक्षक श्री बी जे पाटील व वरिष्ठ लिपिक श्री किशोर पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पालक शिक्षक संघाचे सचिव श्री एस के जाधव सर व श्रीमती एस एस पाटील मॅडम यांनी आपल्या प्रास्तविकातून पालक शिक्षक संघाची आजच्या काळातील गरज, त्याचे शाळेच्या व मुलांच्या शैक्षणिक प्रगतीतील योगदान विषयीचे महत्त्व विशद करून सांगितले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री एस ए पाटील सरांनी शाळेत झालेली विकास कामे जसे की संपूर्ण शाळा व परिसराची सीसीटीव्हीद्वारे निगराणीत असून स्मार्ट डिजिटल क्लासरूम, शैक्षणिक सॉफ्टवेअरद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण तसेच भविष्यात होणारे विविध शैक्षणिक विकास कामे याविषयी माहिती पालकांना दिली.
उपस्थित पालकांमधून श्रीमती छाया पाटील, श्री चतुर सूर्यवंशी, श्रीमती योगिता अहिरे, ॲड. प्रशांत जाधव यांनी आपल्या मनोगतातून शाळेत बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट डिजिटल बोर्ड, शाळेतील सर्व खोल्यांमध्ये झालेले आकर्षक रंगकाम, शाळा परिसरातील भिंतीवरील आकर्षक चित्रे याबद्दल समाधान व्यक्त केले त्याचप्रमाणे अध्यक्षीय भाषणातून मा. मनोहरजी पाटील यांनी संस्थेचा भविष्यातील रोड मॅप, शाळेचे संपूर्ण डिजिटलायझेशन, सर्व वर्गात स्मार्ट बोर्ड द्वारे अध्यापन, तसेच सीबीएससी पूरक अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन याविषयी पालकांना माहिती दिली त्या दृष्टीने शालेय प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांचे विवेचन पालकांना करून दिले
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पाककलेला प्रोत्साहन देण्यासाठी खमंग स्वादिष्ट पदार्थांचा आनंद मेळावा घेण्यात आला मेळाव्याचे *उद्घाटन संस्था अध्यक्ष श्री मनोहरजी गोरख पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.* कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद मान्यवरांसह विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांनी घेतला. आनंद मेळाव्यात भारतीय खाद्य संस्कृतीच्या परंपरेनुसार अनेक स्वादिष्ट खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते. विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये देखील या मेळाव्याबद्दल उत्साह दिसून आला.
*सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री एस ए पाटील व श्री. जे. डी. बोरसे यांनी केले तर मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक श्री बी जे पाटील यांनी मानले.*
तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री डी एच सोनवणे, श्री एस के जाधव, श्री सी व्ही पाटील, श्री एल पी सोनवणे, श्री. भूषण मोरे, श्री. हरीश मोरे श्रीमती व्ही एच पाटील व श्रीमती एन जे देसले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!