*शिंदखेडा येथे महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू*
शिंदखेडा प्रतिनिधी- भूषण पवार
शिंदखेडा : – तहसील कार्यालय धुळे ग्रामीण येथील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश रख्माजी पाईकराव यांच्यावर कार्यालयीन कामकाज सुरू असताना विक्की परदेशी सह चार ते सहा अज्ञात व्यक्तींनी मारहाण करत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे. त्याबाबत शिंदखेडा येथे तहसील कार्यालयाच्या आवारात महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू आहे.दि.20 जानेवारी रोजी कार्यालयीन कामकाज सुरू असतांना हल्लेखोर आरोपी विक्की परदेशी व इतर ४ ते ६ अज्ञात व्यक्तींनी शासकिय कामकाजात हस्तक्षेप करत शासकीय अधिकाऱ्यास अमानुष मारहाण केल्याने त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाही करण्यात यावी या संदर्भात शिंदखेडा येथील महसूल कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या परिसरात काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला आहे.तसेच यासंदर्भात तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तहसिल कार्यालय, धुळे ग्रामीण येथे नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे सुरु असतांना सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव यांना किरकोळ कारणावरुन विनाकारण हुज्जत घालत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन अमानुष मारहाण केली तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे.तहसिलदार धुळे ग्रामीण यांचे दालनात प्रवेश करुन त्यांनादेखील पदाचा मान न ठेवता अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत पाईकराव यांना जीवे मारण्याची धमकी दिली.अशा गुंड प्रवृत्तींच्या इसमांना जोपर्यंत अटक होऊन कठोर कायदेशीर कार्यवाही होत नाही,तोपर्यंत कामकाज बंद करून आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी शिंदखेडा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास कोळी, उपाध्यक्ष कुंदन चव्हाण, सचिव नथा माळी, वरिष्ठ मार्गदर्शक एस बी राणे, श्रीमती एस व्ही बागले, तलाठी संघटनचे विजय सोनवणे, तुषार पवार, दीपक बाविस्कर, एम व्ही गोसावी, एस बी खलाणे, भूपेश कोळी, श्रीमती स्वाती वाघ, रेणुका राजपूत, सोनाली चव्हाण,अनिता भामरे,संजय शिंदे,अमोल पगारे यांच्या सह सर्व पुरूष व महिला कर्मचारी सदर घटनेचा जाहीर निषेध करत आंदोलनात सहभागी होते.