सोनगीर महाविद्यालयाचे *राष्ट्रीय सेवा योजना* शिबिराचे उद्घाटन संपन्न..
प्रतिनीधी – जयपाल गिरासे
*सोनगीर :- येथील बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा प्रारंभ मौजे देवभाने जि.धुळे येथे संपन्न झाला.
शिबिराचे उद्घाटन वीर पत्नी श्रीमती सुनिता पाटील यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.प्रसंगी मार्गदर्शक वक्ते निवृत्त उपप्राचार्य विलास चव्हाण (माजी संचालक- राष्ट्रीय सेवा योजना विभाग उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) संस्थेचे संस्थापक श्री.अमृतराव केशवराव कासार, उपाध्यक्ष श्री.दंगल वामन धनगर, संस्थेचे संचालक, देवभाने गावाचे सरपंच श्री. संजय बुधा देसले,प्रभारी प्राचार्य डॉ.ए.बी.पाटील, मुख्याध्यापक बैसाने सर,तसेच गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
*प्रमुख मार्गदर्शक उपप्राचार्य विलास चव्हाण* यांनी आपल्या मनोगत सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे स्वयंशिस्तीची कार्यशाळा असते.त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची अनुभूती लक्षात घेऊन, देशभक्ती च्या जाणिवा लक्षात घेऊन तसेच महात्मा गांधीजींचे कार्यशील नेतृत्व गुण स्वीकारून शिबिरात सर्व विद्यार्थ्यांनी जात-पात धर्म विरहित जीवनाचा व बौद्धिक व्याख्यानाचा आनंद घ्यावा.शेवटी सामाजिक व देशभक्तीपर कवितांच्या ओळी सांगून भावनाप्रधान केले.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अमृतराव केशवराव कासार* यांनी मनोगतात सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांचे श्रमसंस्काराचे केंद्र आहे.यात विद्यार्थ्यांनी भेदभाव विसरून आपल्या अंगी सुसंस्कृत पणाचे दर्शन घडवून समाजाची सेवा करावी.असे मौलिक विचार व्यक्त केले.
प्रसंगी उद्घाटक श्रीमती सुनीता पाटील,श्री.दंगल वामन धनगर,प्राचार्य डॉ.ए.बी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
सदर शिबिरात 125 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.तसेच दररोज विविध विषयांचे व्याख्याने आयोजित केले जाणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नरेंद्र सोनवणे, सूत्रसंचालन डॉ.डी.आर.पाटील व डॉ.आर.के.जाधव यांनी केले.तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.एस.आर.राणे यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी देवभाने गावाचे ग्रामस्थ,महाविद्यालयाचे प्राध्यापक- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————–+—————–
डॉ.आर.पी.नगराळे
(प्रसिद्धीप्रमुख)
डॉ.ए.बी.पाटील
प्रभारी प्राचार्य