*महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त शस्रांविषयी मार्गदर्शन…!!*
दि. 2 ते 6 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा केला जात असतो त्यानिमित्त शिंदखेडा शहर पोलीस स्टेशन येथे जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील विद्यार्थ्यांना महिला पोलीस कॉन्स्टेबल साक्षी पवार यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शस्त्रे दाखवून मोलाचे मार्गदर्शक केले ऐ के. 47 व पिस्तूल तसेच आधुनिक ऐ के. 57 अशा विविध प्रकारच्या शस्त्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक महिला पोलीस कॉन्स्टेबल साक्षी पवार यांनी करून दाखविले व शस्त्रांविषयी महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलची जास्त सवय झाल्याने अभ्यासाची आवड व पुस्तकी वाचन कमी होत आहे त्यासाठी विद्यार्थ्यांचे पुस्तकी ज्ञान हे अधिक वाढावे याबद्दल पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी प्रवृत्त होण्यासाठी माहिती दिली त्यांनी आपल्या बालपणापासून तर आपल्या कार्यावर नियुक्ती मिळाल्यापर्यंतची संपूर्ण जीवनाची हितगुज विद्यार्थ्यांशी केली शिक्षण व पुस्तकांची तसेच अभ्यासाचे महत्त्व त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पटवून दिले त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे शस्त्रे पहिल्यांदाच बघून आश्चर्य व्यक्त केले
सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब थोरात, हेड कॉन्स्टेबल श्री. अनंत पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल साक्षी पवार तसेच जनता हायस्कूलचे प्राचार्य श्री. एस. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री. बी. जे. पाटील, उपशिक्षक श्री. जे. डी. बोरसे, उपशिक्षिका श्रीमती पि. यू. पवार व श्रीमती आर. ए. पाटील आदी उपस्थित होते