*वकृत्वासह गीतांनी रंगविली जनता हायस्कूल शिंदखेडा येथे सावित्रीबाई फुलेंची जयंती…!!*
प्रतिनीधी – भूषण पवार
शिंदखेडा :- आज दिनांक 03/01/2025 वार शुक्रवार रोजी आशिया खंडातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे *बालिका दिन* व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब श्री. मनोहरजी गोरख पाटील होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सौ.पूजा योगेश सोनार (नवोदित कवयित्री तथा समाजसेविका) यांनी *स्त्री कमी नाही पण स्त्री स्वतंत्रही नाही* या विषयावर आपल्या अहिराणी गाण्यांमधून व वकृत्वातून सर्वांची मने जिंकली. त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थिनींनी देखील कार्यक्रमाला बहर दिला व उत्सुकतेने सहभाग घेऊन आपल्या गीतांमधून, ओव्यांमधून व वकृत्वातून सावित्रीबाईंच्या जीवनाविषयी माहिती मांडण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पी यू पवार यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती पी ए पाटील यांनी मांडले. संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्रीमती एन जे देसले, श्रीमती व्ही एच पाटील, श्रीमती जे एस निकम व सर्व महिला शिक्षिका भगिनींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य श्री एस एस पाटील, पर्यवेक्षक श्री बी जे पाटील, वरिष्ठ लिपिक किशोरजी गोरख पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते .