-1.6 C
New York
Thursday, January 16, 2025

Buy now

spot_img

जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे तालुकास्तरीय उल्हास मेळाव्याचे आयोजन

*जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे तालुकास्तरीय उल्हास मेळाव्याचे आयोजन*

शिंदखेडा :- केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय उल्हास मेळाव्याचे आयोजन जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब रणजीतसिंह गिरासे (सभापती पंचायत समिती शिंदखेडा) होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिक्षकांप्रती असलेली आस्था व्यक्त केली व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून ताईसाहेब एस आर शिंदे मॅडम ( शिक्षण विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी नवभारत साक्षरता अभियान ) यांनी असाक्षर विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी आपली भूमिका मांडली. त्याचप्रमाणे अण्णासाहेब डॉ सी के पाटील (गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिंदखेडा) यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांतर्गत असाक्षर विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक साधनांच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे QR Code च्या माध्यमातून असाक्षर विद्यार्थ्यांना ॲपच्या माध्यमाने सोप्या पद्धतीने अध्यापन करण्यासाठी मार्गदर्शन देखील मिळाले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दादासाहेब दिपकजी मोरे (उपसभापती पंचायत समिती शिंदखेडा), भाऊसाहेब श्री मनोहरजी गोरख पाटील (अध्यक्ष जनता विद्या प्रसारक संस्था शिंदखेडा), डॉ. सी के पाटील (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिंदखेडा), ताईसो एस आर शिंदे मॅडम (शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा), आण्‍णासो श्री सी जी बोरसे ( शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा ), ताईसो श्रीमती रेखा शेवाळे मॅडम ( केंद्रप्रमुख पंचायत समिती शिंदखेडा ), ताईसो श्रीमती वैशाली बच्छाव मॅडम (केंद्रप्रमुख पंचायत समिती शिंदखेडा), दादासो श्री राजेंद्र नांदोळे (केंद्रप्रमुख पंचायत समिती शिंदखेडा), दादासो प्रल्हाद पाटील (केंद्रप्रमुख पंचायत समिती शिंदखेडा), श्री कैलास शिंदे सर, रावसाहेब श्री बैसाणे सर तसेच शाळेचे प्राचार्य आण्‍णासो एस एस पाटील व पर्यवेक्षक दादासो बी जे पाटील, वरिष्ठ लिपिक बापूसाहेब किशोरजी गोरख पाटील आदी मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उत्सव समिती प्रमुख एस ए पाटील सर यांनी केले व आभार शाळेचे निरीक्षण अधिकारी श्री एस के जाधव सर यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!