*कल्पतरू मोफत संगीत योग ग्रुपचा वर्धापन दिन साजरा*.
धुळे :- प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी आणि कल्पतरू महिला विकास मंडळ समन्वयाने सुरू झालेल्या योग केंद्रास दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी एक वर्ष पूर्ण झाले एक वर्षाची सांगता म्हणून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शिवाजीनगर येथे योग केंद्र सुरू करण्यासाठी योग गुरु आदरणीय शिंदे सर, श्रीयुत नागराज पाटील सर सौरत्नाताई नागराज पाटील श्रीयुत शैलेश चव्हाण सर यांनी अथक प्रयत्न केले.
आजच्या कार्यक्रमाला वरील सर्व मान्यवरांची उपस्थिती होती. श्रीयुत बेडसे सर व सौ अलका बेडसे श्री नेरकर सर यांचीही उपस्थिती लाभली.
योग गुरु आदरणीय अशोक जी शिंदे सर यांनी धुळ्यात मोफत योगसाधनेचा पायंडा पाडला. संपूर्ण धुळ्यात 36 ठिकाणी हे प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी मोफत योग केंद्र सुरू आहे अनेक महिला पुरुष यांना आरोग्याचे लाभ मिळत आहेत, बीपी, शुगर थायरॉईड व अनेक दुखणे यापासून हजारो लोकांना लाभ मिळत आहेत धुळ्यासोबतच अमळनेर शिरपूर चोपडा या ठिकाणी सुद्धा योग गुरु आदरणीय अशोक जी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाने योग केंद्र सुरू झालेले आहेत. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचा प्रयत्न करावा.
कल्पतरू योग ग्रुप ला गाईड म्हणून निस्वार्थ सेवा देणाऱ्या भगिनी पुढीलप्रमाणे योगिता चौधरी, दिपाली लाकडे, लता पवार, मंगला ठोंबरे, ज्योतीताई, पूजा वाकडे ,भारती भामरे, अर्चना चौधरी, गायत्री पाटील, शिल्पा जाधव, सुनिता पाटील, किरण सोनवणे,कल्पना पाटील,नैना कूवर.
मान्यवरांनी अतिशय योग्य असे मार्गदर्शन कार्यक्रमातील महिला भगिनींना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन दिपाली राजेश चौधरी यांनी केले.