*जिल्ह्यातील 80 ग्रामपंचायतींची सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण*
धुळे, दिनांक 24 डिसेंबर, 2024 : – जिल्ह्यातील सरपंच पदाची आरक्षणाची प्रक्रिया पुर्ण करणेसाठी उपविभागीय अधिकारी धुळे / शिरपूर यांना प्राधिकृत करण्यात आले होते.
त्यानुसार धुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून बिगर अनुसूचित क्षेत्रातील 80 ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जाती स्त्री, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती स्त्री, नागरीकांचा मागास प्रवर्ग व नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री सरपंच पदाकरिता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे आरक्षण सोडत घेण्यात आली. अशी माहिती नायब तहसिलदार (सामान्य) गोपाळ पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
*अनुसूचित जाती सरपंच पदासाठी निश्चित ग्रामपंचायती-* पदसंख्या-8 पैकी 4 महिला-धुळे तालुका-जापीनंदाळे बु. स्त्री, तालुका शिंदखेडा, आछी, दुभाषी, तालुका शिरपूर-भोरटेक, रुदावली स्त्री, तालुका साक्री- लोणखेडी, स्त्री, कळंभीर स्त्री.
*अनुसुचित जमाती सरपंच पदासाठी निश्चित ग्रामपंचायती* – पदसंख्या 12 पैकी 04 महिला तालुका धुळे-गोताणे, सौंदाणे, तालुका शिंदखेडा- भडणे स्त्री, खर्दे बु.,वरपाडे स्त्री, विखरण स्त्री, तालुका शिरपूर- जापोरे, टेंभे बु.,वनावल, तालुका साक्री-अष्टाणे, कोकले,आयने / मळखेडे स्त्री.
*नागरिकांचा मागास प्रवर्ग* सरपंच पदे 17 पैकी 9 महिला तालुका धुळे- धाडरी,निमगुळ, लामकानी स्त्री, धाडरा स्त्री, शिरधाने प्र. डां. स्त्री, नाणे स्त्री, तालुका शिंदखेडा- शेवाडे- रुदाणे, चिरणे वरझडी स्त्री, वाघाडी बु. स्त्री, डोंगरगांव स्त्री, तालुका शिरपूर- सुभाषनगर, नवेभामपूर, चांदपुरी, अहिल्यापूर, पिळोदे स्त्री, तालुका साक्री-चिंचखेडे
*सर्वसाधारण सरपंच पदाकरिता* अनुज्ञेय पदसंख्या 43 पैकी 22 महीला तालुका धुळे- कुंडाणे (वरखेडी), कुसुंबा, नावरी, अनकवाडी, वडणे, हेंद्रूण, नवलनगर,अंचाळे तांडा,रानमळा, काळखेडे स्त्री, जुन्नेर स्त्री, आर्वी स्त्री, बुरझड स्त्री, सातरणे स्त्री, तालुका शिंदखेडा- चौगांव खु., दाऊळ, देगांव, पाटण, टाकरखेडा, वर्षी, कमखेडा, चिलाणे स्त्री, मेथी स्त्री, पिंपरखेडा स्त्री, वाघाडी खु स्त्री. बाभळे स्त्री, मालपूर स्त्री, तालुका शिरपूर-त-हाडी त.त., भरवाडे, अजंदे खु.स्त्री, जैतपूर स्त्री, पिंप्री स्त्री, सावेर- गोदी स्त्री, आढे स्त्री, तालुका साक्री- हट्टी बु./ घाणेगांव, म्हसाळे, उंभरे स्त्री, नांदवण स्त्री, उंभर्टी स्त्री,अक्कलपाडा स्त्री, फोफरे स्त्री, काळगाव स्त्री, इंदवे स्त्री.