प्रताप पुरी जी महाराजांचे
तामथरेत उस्फूर्त स्वागत.
“””””””””””””””””””
प्रतिनीधी – निरंक गिरासे
चिमठाणे :- तामथरे येथे साकार होत असलेल्या श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या कटी शिला पूजनासाठी निमंत्रित केलेले राजस्थान मधील तारा तारा मठाचे महंत ,पोखरण विधान सभेचे आमदार, प्रतापपुरीजी
महाराजांचे काल , तामथरे स्थित, संकल्पीत श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या प्रांगणात आगमन झाले , तेव्हा त्यांचे विधीवत, साग्रसंगीत, उस्फूर्त स्वागत
करण्यात आले.
श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.महेंद्र महाराज, रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजश्री कुंवर सिंह राजेंद्रसिंह नरूका साहेब, व्रुंदावनचे कौशल किशोर ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भक्त जणांनी
केलेले आत्मिक स्वागत अनुभवून आ.प्रतापपूरीजी महाराज प्रभावित झालेत.
प्रती वर्षा प्रमाणे या वर्षीही संपन्न होत असलेल्या
नाम सप्ताहाचे औचित्य साधून, आज रवीवार दिनांक
२२-१२-२०२४ रोजी आ.प्रताप पूरी महाराजांचे हस्ते
कटीशिला पूजन संपन्न झाले.
असंख्य भक्तजणासह विध क्षेत्रातील मान्यवरांच्या
ऊपस्थितीत हा लक्षणीय, स्मरणीय कार्यक्रम ईवल्याशा
तामथरे गावांत संपन्न होत आहै.