13.6 C
New York
Wednesday, December 11, 2024

Buy now

spot_img

असलोद गावाचा ऎतिहासिक निर्णय – अखेर आडवी बाटली झाली विजयी

*असलोद गावात संपूर्ण दारूबंदी साठी महिलांचे मतदान*

*अखेर आडवी बाटली चा विजय*

*शहादा :-  शहादा तालुक्यातील असलोद गावातील अवैध दारू विक्री बंदी सह बियर बार आणि शॉपी चा परवाना रद्द करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या आडवी बाटली व उभी बाटली वर महिलांचे मतदान प्रक्रिया राबविली. त्यात आडव्या बाटलीने प्रचंड विजय मिळवला आहे. त्यामुळे शासनाला संपूर्ण दारूबंदी करणे भाग पडणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील असलोद गाव आणि परिसरात असलेल्या अवैध दारू विक्री वर्षेनुवर्षे सुरू आहे. तसेच गावा जवळच मुख्य रस्त्यावर बियर बार आणि शॉपी सुरू आहे. त्यामुळे गावातील महिलांसह ग्रामस्थांनी गाव आणि परिसरात असलेल्या अवैध दारू विक्री कायम स्वरुपी बंद होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर जिल्हा प्रशासनाने दारू बंदी साठी आडवी बाटली आणि ऊभी बाटली वर गावातील महिलांसाठी मतदान प्रक्रिया राबविली. एकूण १ हजार २०० महिला मतदारांसाठी तीन बूथ निश्चित करण्यात आले होते. या मतदान प्रक्रियेत एकूण ६७७ महिलांनी मतदान केले. त्यात आडव्या बाटलीला तब्बल ६१२ मते मिळाली. बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया तहसिलदार दिपक गिरसे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पोलिस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्या उपस्थितीत पोलिस यंत्रणा ने चोख बंदोबस्त ठेवला होता. आडव्या बाटलीने विजय मिळाल्याने गावात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!