spot_img
spot_img

*महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024- धुळे जिल्हा

 

*महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024*
*धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात*
*56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 46 उमेदवारांची माघार*

धुळे, दिनांक 4 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. धुळे जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदार संघ येतात. या निवडणुकीसाठी आज माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात 46 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वाधिक 18 उमेदवार साक्री विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी 6 उमेदवार शिरपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील 05-साक्री विधानसभा मतदार संघात एकूण 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 18 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.

06-धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात एकूण 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 3 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.

07-धुळे शहर विधानसभा मतदार संघात एकूण 20 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 8 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.

08-शिंदखेडा विधानसभा मतदार संघात एकूण 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.

09-शिरपूर विधानसभा मतदार संघात एकूण 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 7 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 6 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
00000

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!