*शिंदखेडा तालुक्यात पाचव्या दिवशी एकूण 8 उमेदवारांचे 13 नामांकन अर्ज दाखल*
शिंदखेडा : – महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अधिसूचना प्रसिध्द झाली असून त्यानुसार धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजच्या पाचव्या दिवशी दि.२८ ऑक्टोबर सोमवारी शिंदखेडयांत ८ उमेदवारांनी १३ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून 4 व्यक्तींनी १३नामनिर्देशन पत्र घेतल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघाची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी शिंदखेडा विधानसभा मतदार संघासाठी आम आदमी पार्टी कडून हितेंद्र रमेश पवार – १ पक्ष व १ अपक्ष तर बहुजन समाज पार्टीतर्फे भाऊसाहेब नामदेव पवार १, काँग्रेस कडून शामकांत रघुनाथ सनेर – १ पक्षातर्फे व १ अपक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आबासो ज्ञानेश्वर आनंदा भामरे -१ व अपक्ष ३, दीपक दशरथ अहिरे अपक्ष-१,नामदेव रोहिदास येडवे अपक्ष -१, भारतीय जनसम्राट पार्टी कडून गणेश वामन वाडीले -१, दिनेश भटूसिंग जाधव – अपक्ष १ उमेदवार म्हणून यांनी असे एकूण १३ अर्ज दाखल केले आहेत तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पाचव्या दिवशी शिंदखेडा विधानसभा मतदार संघासाठी ०८-शिंदखेडा ८ व्यक्तींनी १३ अर्ज असे एकूण १३ शिंदखेडा विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन दाखल झाल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे